Shegaon news |अनिष्ट रूढी परंपरा यांना फाटा देऊन समाज बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज – रमेश पाचपोर

 

अकोला येथे गोंधळी समाज उपवर युवक युवती परिचय मेळावा उत्साहात..

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

अकोला : shegaon news: परिचय मेळाव्यातून वेळ व पैसा तर वाचतोच शिवाय समाजाचे एकत्रीकरण होते. यासाठी सकल गोंधळी समाजाच्या वतीने उपवर युवक – युवती परिचय संमेलन घेण्यात आले.

असेच उपक्रम नियमित सुरू राहावेत यासाठी समाजाचे संघटन असणे फार महत्त्वाचे असून समाजाच्या प्रगतीसाठी अनिष्ट रूढी परंपरा यांना फाटा देऊन एकत्र व्हा असे मत सकल गोंधळी समाजाचे कार्यक्रम व्यवस्थापक संचालक
रमेश पाचपोर यांनी केले.

अकोला जानोरकर मंगल कार्यालय
येथे दि. १३ जानेवारी रोजी गोंधळी समाज राज्यस्तरीय परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दामोदरराव शिंदे तर उद्घाटक प्रल्हादराव उगले होते.

प्रमुख अतिथी म्हणून प्रा. राजेश भांडे, डॉ.श्यामसुंदर सोनोने, गणेशराव इंगोले, चंदू महाजन, डॉ. रमेश वेले, माजी नगरसेविका सौ. प्रमिलाताई पु. गिते, रामरावजी सोनारगन, नामदेवराव ढुके, अविनाश नवरखेडे, देविदास पाचपोर, सुधाकर गिते, विजय गीते, योगेश गिते, जीवन पवार, स्वराताई मराठे,माधुरीताई गोरे, डॉ प्रभाकर मुद्गगल,वासुदेव वाघडकर,विजय दुतंडे,गजानन लेखणार यांची उपस्थिती होती.

Akolanews | मुर्तीजापुर शहरात नमो चषक मॅरेथॉन स्पर्धा आमदार हरीश पिंपळे यांनी दिली हिरवी झेंडी

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तुळजा भवानी माता छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करुन राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्यास सुरुवात झाली.यावेळी दामोदरराव शिंदे उद्घाटक प्रल्हादराव उगले, प्रा.राजेश भांडे, स्वराताई मराठे आदींनी मनोगत व्यक्त केले.

परिचय मेळाव्यात समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती यावेळी ६८ मूल २७ मुलींनी आपला परिचय नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ रमेश वेले तर आभार दिनेश महाजन यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल पाचपोर, गणेश भागवत, शिवा पाचंगे, रविराज वाघडकर, गोपाल हांडे, शुभम पचांगे, निलेश गंगावणे, शुभम पाचपोर परिक्षीत कानडे आदींनी परिश्रम घेतले.

चौकट..
परिचय संमेलनात गोंधळातून समाज प्रबोधन

गळ्यात संबळ, काखेला झोळी आणि डोईवर बलुत्याचं गाठोडं घेऊन गोंधळी समाज पिढ्यानपिढ्या गावोगाव गोंधळ मांडत राहिले. छत्रपती शिवरायांच्या काळात गोंधळी समाज लोकांच्या समोर पोवाडे गाऊन राष्ट्रभक्ती व धर्मभक्ती याचे महत्त्व सांगत. समाजातील वाईट चालीरितींचा प्रभाव कमी करण्याचा ते प्रबोधनातून प्रयत्न करीत होते.

Shegaon news: कार्यक्रम स्थळी तुळजाभवानी समोर गोंधळ घालून समाज प्रबोधन करण्यात आले. मधुकर गंगावणे, गजानन दोरकर सुखदेव पेंढारी, रामराव सोनारगण, सुखदेव पेंढारी, संतोष पचांगे, दिनेश गंगावणे, युवा कलाकार शिवा पचांगे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Leave a Comment