प्रतिनिधी सचिन वाघे
Atulvandile/हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव चौकातील उड्डाणं पुलावर एका वर्षात दोनवेळा पडलेल्या जीवघेण्या खड्ड्या बाबत पुराव्या सहित माहिती केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना भेटून दिल्यानंतर ना. गडकरी यांनी त्वरित राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यां ह्या उड्डाण पुलाबाबत माहिती देऊन सदर काम करणाऱ्या ठेकेदाराला ताबोडतोब ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याचे आदेश दिले.
ना. गडकरी यांचा आदेश येण्याच्या आधी ज्या पद्धतीने थातूर मातुर काम सुरु होते ते बंद करून वरिष्ठ महामार्ग अधिकारी हें स्वतः आपल्या तांत्रिक अधिकारी वा कर्मचाऱ्यांसह स्वतः घटनास्थळी येवून या पुलाची स्थायी स्वरूपात दुरुस्तीचे काम सुरु केले आहे.
SarpanchNews/संग्रामपूर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर.
यांच बरोबर उपजिल्हा रुग्णालयाजवळील व कलोडे चौक येथे सुरु असलेल्या उड्डाण पुलाच्या कामाकडेही या राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांचे बारीक लक्ष दिसत आहे. दि. 7 जुलैला ना. नितीन गडकरी यांना राका नेते अतुल वांदिले यांनी प्रत्यक्ष भेटीत निवेदन दिल्यावर व ना. गडकरी यांनी त्वरित दखल घेतल्याने हिंगणघाटचे सर्वसाधारण नागरिक या दोघांनाही धन्यवाद देत आहे. यावेळी मनसेचे राज्य चिटणीस हेमंत गडकरी हें उपस्थित होते.
Nitingadkariयेथील राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालया जवळील लोखंडी पूल वणा नदीवर स्थानांतरीत करण्याच्या एका विरोधी पक्षाच्या नेत्याने करूनही पक्ष भेद विसरून या दोन्ही मागणीची त्वरित दखल ना गडकरी यांनी घेतली हें विशेष! यावेळी राकाचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील राऊत, दशरथ ठाकरे उपस्थित होते.