हिंगणघाट शहरातील डागा मिल (गिरणी) सुरू करा.अतुल वांदिले (Atulvandile )

0
196

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- हिंगणघाट शहरातील केंद्र सरकार पुरस्कृत रावबहादुर बन्सीलाल अभिरचंद, डागा मिल (गिरणी) सुरू करा. यासाठी जिल्ह्यातील पालकमंत्री मा. ना. पंकज भोयर यांनी विशेष लक्ष घालावे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचे आहे.Atulvandile

हिंगणघाट शहर हे वर्धा जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे शहर आहे. व ते कामगारांचे शहर म्हणून त्यांची ओळख आहे.

Ajitpawar/घरपट्टेसाठी सामाजिक कार्यकर्ता विक्की वाघमारे यांचे उपमुख्यमंत्र्याकडे साकडे

येथील केंद्र सरकार पुरस्कृत रावबहादुर बन्सीलाल अभिरचंद डागा मिल्स स्पिनिंग अँड वीविंग मिल 1881 मध्ये सुरू झाली असून सदर गिरणीचे सन 1992-93 दरम्यान उत्पादन बंद करण्यात आले. व या गिरणीत उर्वरित 450 ते 500 कामगार काम करीत होते. या कामगारांना (स्वेच्छा निवृत्ती योजने अंतर्गत) VRS देऊन घरी पाठवण्यात आले.

ही गिरणी जवळ – जवळ 140 वर्ष जुनी असून या गिरणी मधून असंख्य कामगारांना रोजगार मिळत होता. परंतु या गिरणीचे उत्पादन पूर्णतः बंद झाल्यामुळे बाजारपेठेतील कापड व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता.

त्यामुळे हजारो लोकांवर बेरोजगारीचे संकट आले असून त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे. तसेच हिंगणघाट शहरासह ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून युवक तरुण, तरुणी रोजगारापासून वंचित आहे.

सदर गिरणी जर पूर्वरत सुरू केली तर हिंगणघाट शहरातील व ग्रामीण भागातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो.

त्यामुळे पालकमंत्री मा.ना. पंकज भोयर यांनी जातीने लक्ष घालून केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून ही गिरणी तात्काळ सुरू करावी व हिंगणघाट शहर व तालुक्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here