Atulvandile /हिंगणघाटचा अभिमान! नाशिक मोर्चाचे यशस्वी निरीक्षण करणाऱ्या अतुल वांदिले यांचा मुंबईत सत्कार

0
216

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट – संघर्षातून प्रगती साधणारे नेतृत्व म्हणजे अतुल वांदिले! राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस असलेले वांदिले यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर पक्षात महत्त्वाचे स्थान मिळवले आहे.

नुकत्याच 15 सप्टेंबर रोजी नाशिक येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राका गटाने आयोजित केलेल्या भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचे निरीक्षक म्हणून वांदिले यांची निवड करण्यात आली होती. या मोर्चाचे संपूर्ण नियोजन, समन्वय आणि यशस्वी आयोजनाची जबाबदारी त्यांनी लीलया पार पाडली.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी अतुल वांदिले यांनी सलग 12 दिवस नाशिक जिल्ह्यात राहून, विविध गावांना भेटी देऊन, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि प्रेरणा निर्माण केली. त्याच्या यशस्वी आयोजनाची दखल स्वतः पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी घेतली आणि दिनांक 28 सप्टेंबर रोजी मुंबई येथील पक्ष कार्यालयात सन्मान चिन्ह देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Atulvandile/या गौरवप्रसंगी माजी आमदार सुनील भुसारा, रवींद्र पवार, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
“हा केवळ माझा नव्हे, तर हिंगणघाटच्या मातीचा सन्मान आहे,” असे नम्र उद्गार वांदिले यांनी सत्कारानंतर काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here