Atulvandile /वर्धा जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले — राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून नियुक्ती

0
24

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब यांच्या आदेशाने, प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते ही नियुक्ती स्वीकारण्यात आली.
या नियुक्ती प्रसंगी माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, माजी आमदार सुनिल भुसारी, माजी जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

अतुल वांदिले हे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, सामाजिक चळवळींसाठी आणि युवकांच्या संघटन कार्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या नेतृत्वगुण, राजकीय दूरदृष्टी आणि संघटन कौशल्याचा गौरव करत प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे म्हणाले, “वांदिले यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती ही संघटन बळकट करण्यासाठीचा ठोस निर्णय आहे.”

या नियुक्तीमुळे वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नव्या उत्साहाने आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या पक्ष म्हणून उभा राहील, असा विश्वास नव नियुक्त जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी व्यक्त केला.

Atulvandile/वांदिले यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, जिल्ह्यातील सर्व तालुके, नगरपरिषदा आणि ग्रामीण भागातून अभिनंदन संदेशांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर “योग्य व्यक्तीला मिळालेली योग्य जबाबदारी” अशा शब्दांत पक्ष नेतृत्वाचे आभार मानले जात आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here