पोलिस प्रशासनाना समोर मोठे आव्हान?लक्ष देणार काय?
अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.
संग्रामपूर:-संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल मानलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले टूनकी नावाचे गाव आहे.येथील सरकार मान्य देशी दारूचे दुकान हे जळगाव जामोद रोडवर असून त्या ठिकाणी लावलेले फलकावर सकाळी देशी दारूचे दुकान उघडण्याची व बंद करण्याची वेळ स्पष्ट स्पष्टपणे लिहिलेली असून सुद्धा शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
नियमानुसार सकाळी आठ वाजता ते रात्र दहा वाजेपर्यंत आणि किरकोळ विक्रेता लिहिलेले असून सुद्धा संबंधित देशी चे दुकान सकाळी सात वाजताच दुकान उघडून त्या दुकानांमधून चोरी,चोरी, अवैध” रीतीने सकाळी कॉटरी चिल्लर व ठोक पेट्यांची विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.
तसेच दुकानांमधून सकाळी पेट्या बाहेर काढून मोटरसायकल द्वारे तालुक्यामधील छोटे-मोठे खेड्यापाड्यात दारू पोहचवली जाते.तर या नियमबाह्य प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन की दुर्लक्ष?या सर्व गोष्टींचा नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असून अवैध दारूचा व्यवसाय अधिक जोर धरत असून तसेच तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांच्या संसारातील छोट्या मोठ्या मुलांच्या भविष्याची राखरांगोळी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
या प्रकरणामुळे परिवारांची आयुष्याची राख रांगोळी होत असून आई-वडिलांच्या व आजी,आजोबांच्या नजरेसमोर त्यांचे भविष्य अंधारामय झाल्याचे दिसत आहे.याचे जिम्मेदार कोण?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तर आदिवासी भागामध्ये लोक शेतीमध्ये काम करतात रात्र दिवस त्यामध्ये शेतीचे नुकसान कपासी खराब झाल्या तुरी पसरल्या हरभरा खराब झाला मजुरी निघेना आणि जवान तरुण हा व्यसनाधीन होऊन संसाराची राख रांगोळी होत आहे आणि अधिकारी सुद्धा या अवैध्य दारू वाहतूक करणाऱ्यांवर लगाम लावत नाही? की कुणाच्या तरी आशिर्वादाने दारू विक्री होत आहे? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
उघडपणे सर्रास मोटरसायकलवरून दारूचे बॉक्स खेड्यापाड्यांमध्ये सेलिंग करून दिलें जातात.परंतु कार्यवाही संबंधित अधिकाऱ्यांकडून होत नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या निर्देशनामध्ये अवैद्य वाहतूक करताना भरपूर वेळेस आढळून आलेले.
त्यामुळे आता लोकांच्या उत्तम जीवनाचा आणि चांगले जगण्याचा प्रश्न निर्माण झाले आहे? Avedhadaru