हिवाळी अधिवेशनातुन सुध्दा होमगार्ड चे प्रश्न दुर्लक्षित- सोनु मोहोड /homeguard

 

इस्माईल शेख बुलढाणा .जि. प्र.

होमगार्ड संघटनेकडुन लोकप्रतिनिधींसह विविध पक्षातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते मंडळींना होमगार्ड च्या समस्या व प्रश्न लेखी स्वरुपात कळवुन सुध्दा सर्वांनीच दुर्लक्ष केले. हा प्रश्न चालु अधिवेशनात तरी मांडल्या जाणार ही अपेक्षा असतांना कुठल्याही नेत्यांनी या संदर्भात सकारात्मक भुमिका मांडली नसल्याचे दिसुन येते. असा,आक्षेप सोनु मोहोड यांनी घेतला आहे.

मोहोड यांनी म्हटले की, राज्यात ४८ हजार होमगार्ड महिला व पुरुष कार्यरत आहेत.त्यांच्या वर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. त्यांचे प्रश्न समजुन घ्यावे व चालु हिवाळी अधिवेशनात त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींची भुमिका असायला हवी होती.

मात्र,नागपुर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असतांना सुध्दा विदर्भातील एकही आमदार किंवा मंत्री याप्रश्नांवर बोलायला तयार नाही. होमगार्ड प्रश्न मांडतांना मोहोड यांनी म्हटले की,निष्काम सेवा हे वाक्य हटवुन नियमित सेवा करावे,३६५ दिवस होमगार्डला काम द्यावे,सेवा निवृत्ती ५८ वरुन ६० करावे,निवृत्तीनंतर भत्ता देण्यात यावा,

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होमगार्ड सैनिकांना सातव्या वेतन आयोगानुसार मानधन वाढवुन देण्यात यावे,महिला होमगार्डला महिला पोलिस प्रमाणे प्रसुती रजा मिळुन इतर सुविधा द्याव्यात,होमगार्ड यांची दर ३ वर्षांनी होणारी पुनर नोंदणी प्रक्रीया बंद करण्यात यावी.अशा स्वरुपाच्या मागण्यांचे यापुर्वी लोकप्रतिनिधींना देवुन सुध्दा दुर्लक्ष करण्यात आले.

 

 

येथे क्लिक करावे

 

https://www.suryamarathinews.com/avedhdaru/

हिवाळी अधिवेशनात होमगार्ड चे प्रश्न मांडल्या जातील अशी अपेक्षा असतांना सुध्दा सरकारमध्ये असलेल्या लोकप्रतिनिधी सह विरोधकांची भुमिका सुध्दा सकारात्मक नाही. असे सोनु मोहोड यांनी म्हटले / homeguard

Leave a Comment