श्रीराम जन्मभूमी अयोध्या आयोजित जिवतीत अक्षता वितरण कार्यक्रम! ayodhya ram mandir

 

कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी!

जिवती -प्रचंड आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या राम भक्तांना अखेर “राम लला हम आयेंगे” ही हाक ऐकत त्यांना अयोध्या येथे श्री राम यांनी भक्तांना अभिषेक कार्यक्रमासाठी अक्षता पाठविले असून 22 जानेवारी ला श्री राम अयोध्येला विराजमान होणार आहेत.

त्या निमित्याने आपल्या गावात प्रोग्राम घेऊन या कार्यक्रमात आपला सहभाग घ्यावा.यासाठी आपल्या गावी या दिवशी मोठा कार्यक्रम घेऊन आनंद साजरा करावा यासाठी अयोध्या येथून आलेल्या अक्षता वितरण करण्यात आल्या.यासाठी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात राम भक्त एकत्र येऊन जिवती येथील हनुमान मंदिर ते महादेव मंदिर अशी कलश यात्रा काढण्यात आली.

व तेथे राम भक्तांना मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.व अक्षता वितरण करण्यात आले.यावेळी श्री.पू.भगीरथ महाराज ,नागपूर,रोडमल्ल गहलोत ,विहीप जिल्हा अध्यक्ष,विनोद तिवारी,जिल्हा मंदिर संपर्क प्रमुख, सत्यनारायण खेगर,जिल्हा मंत्री उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी गुट्टे यांनी केले.

हेही वाचा सविस्तर

https://www.suryamarathinews.com/gst-crimenews/

यावेळी कार्यक्रमाचे यशस्वी करिता माऊली महाराज नोकेवडा,सुरेश केंद्रे,शेळके महाराज, दिपक महाराज पुरी,संग्राम महाराज मोरे, भीमराव महाराज पल्लेझरी,नारायण महाराज कणसे,माणिक महाराज कोलांडी,घोगरे महाराज, दत्ता राठोड सेवादास नगर,गोविंद ठोंबरे सह अनेक राम भक्त यांनी सहकार्य केले. ayodhya ram mandir

Leave a Comment