आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी एलपीओ हॉलिडेजकडून आयोजन एक्सक्लुझिव्ह B2B एजंट्स मीटचं (B 2B )

0
3

 

B2B:पुणे – 18 मार्च 2025 : आंतरराष्ट्रीय पर्यटनक्षेत्रातील लोकप्रिय एलपीओ हॉलिडेज (LPO Holidays) कंपनीच्या वतीने पुण्यात ‘एक्सक्लुझिव्ह B2B ट्रॅव्हल एजंट्स मीट’चं शनिवारी (15 मार्च) आयोजन करण्यात आलं होतं.

स्थानिक ट्रॅव्हल एजंट्सना आंतरराष्ट्रीय पर्यटनविश्वाशी जोडून व्यवसायाला बळकटी देण्याच्या उद्देशाने या मीटचं पहिल्यांदा पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं, नंतर मध्य प्रदेशातील इंदूर, उत्तर प्रदेशातील लखनौ त्यानंतर संपूर्ण देशभरात अशा मीट्स आयोजित केल्या जाणार आहेत.

KapusBajarbhav / कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी कापसाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांपर्यंत सुधारणा

जागतिक पर्यटनाबद्दलची सखोल जाण असलेल्या अनुभवी कंपनीकडून एजंट्सना एक्सक्लुझिव्ह ट्रॅव्हल पॅकेजेस उपलब्ध करून देणं आणि तंत्रज्ञानातील संशोधन आणि सोयीसुविधांचा उत्तम मेळ व्यवसायात घालण्यात मदत करणं हा या मीटचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती एलपीओ हॉलिडेजचे संस्थापक आणि प्रमुख सुशील टिब्रेवाल यांनी दिली.

अमर्याद ग्रुप ट्रॅव्हल सोल्युशन्स, कम्पिटेटिव्ह प्रायझिंग याचबरोबर एक्सक्लुझिव्ह व्हाईट-लेबल संधींच्या माध्यमातून एजंट्सना त्यांच्या ब्रँडची लोकप्रियता  वाढवण्यासाठी एलपीओ हॉलिडेजशी केलेला करार उपयुक्त ठरणार आहे.

सुशील टिब्रेवाल म्हणाले, “ट्रॅव्हल इंडस्ट्रीतील अनेक वर्षांच्या अनुभवाच्या बळावर अगदी योग्य नियोजन करून ठरवलेल्या डिपार्चर आणि अरायव्हलच्या वेळा, कोणत्याही अडचणींविरहित ऑपरेशन्स देणारी कंपनी अशी ख्याती असलेली एलपीओ हॉलिडेज एजंट्सना हमी देते की, कुठलीही आंतरराष्ट्रीय पॅकेजेस शेवटच्या क्षणी रद्द होत नाहीत किंवा त्यात काहीतरी विचित्र बदलही केले जात नाहीत. एलपीओ हॉलिडेजची विश्वासार्ह सेवा आणि जादा फायदा यांच्या बळावर या मीटमध्ये सहभागी झालेले एजंट्स त्यांच्याकडची पॅकेज ऑफरिंग्ज वाढवू शकतील आणि अधिकाधिक कमाईही करू शकतील.”

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

एजंट्सना आपल्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम पर्यटन अनुभव देण्यात मदत करण्यासाठी विश्वासार्ह व मजबूत B2B कोलॅबरेशन्सच्या माध्यमातून एलपीओ हॉलिडेज ट्रॅव्हल व्यवसायाची पारंपरिक पद्धतीच बदलू पाहत आहे. या कोलॅबरेशन्समुळे एजंट्स आणि ग्राहक दोघांनाही आंतरराष्ट्रीय प्रवास सेवा सहज उपलब्ध होतील आणि किफायतशीर होतील.

B2B:“फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, उर्वरित युरोपासह सगळ जग फिरण्याचं प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असतं आणि आम्ही ते स्वप्न वास्तवात आणतो. आमच्या एलपीओ हॉलिडेजची आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ट्रॅव्हल पॅकेजेस अनुभवल्यानंतर असंख्य भारतीय कुटुंबियांनी आणि ग्राहकांनी आनंदाची अनुभूती घेतली आहे,” असंही एलपीओ हॉलिडेजचे संस्थापक सुशील टिब्रेवाल यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here