Bjpnews /हिंगणघाटमध्ये भाजपला अनपेक्षित कलाटणी; नगराध्यक्ष पदासाठी बसंतानी यांची अपक्ष उमेदवारी चर्चेत

0
1053

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट नगराध्यक्ष पदाची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना भारतीय जनता पक्षाच्या शहरातील राजकारणात अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजपने डॉ. नयना उमेश तुळसकर यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली. मात्र या निर्णयानंतर पक्षातील नाराजी उफाळून आली असून त्याचे पडसाद शहरभर उमटू लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांनी आपल्या पत्नी जया प्रेम बसंतानी यांना अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शहराच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली असून भाजपमध्ये दोन गट स्पष्टपणे दिसू लागले आहेत.

डॉ. तुळसकर यांच्या उमेदवारीचे अनेक कार्यकर्त्यांनी स्वागत केले असले तरी बसंतानी यांच्या अपक्ष उमेदवारीकडे “पक्षविरोधी भूमिका” म्हणून पाहिले जात आहे.

Hingnghatnews /त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीची रंगत आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here