हिंगणघाट येथील माजी नगरसेवक बाबाराव दादाजी ठाकरे यांचे सह अनेक पुरुषांनी केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश(Bjpnews)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Bjpnews:हिंगणघाट :- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.

फरार असलेल्या गुन्हेगार हैदर खान अन्वर खान याला खामगाव पोलिसांनी केली सीताफिने अटक.(crimenews )

आज दि. ०८ रोजी हिंगणघाट येथील पुरुषांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. ०८ सप्टेंबर २०२४ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने बाबाराव दादाजी ठाकरे , विजय वाघ, भारत नेरकर, हर्ष ठाकरे ईत्यादीसह अनेक पुरुष कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात रितसर प्रवेश देण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

Bjpnews :-सदर कार्यक्रमाचे वेळी आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, हिंगणघाट तालुका अध्यक्ष विनोद विटाळे, समाजसेवक सुनील डोंगरे, हिंगणघाट भाजपा शहराध्यक्ष भूषण पिसे, समाजसेवक संजय मगर, रवी काटवले, अजय ठोंबरे इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.

Leave a Comment