प्रतिनिधी गुड्डू कुरेशी
Bjpnews:सिंदी रेल्वे येथे भारतीय जनता पार्टी चा स्थापना दिवस भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष राजू गंधारे यांच्या नेतृत्वात जिल्हा सचिव स्नेहल कलोडे यांनी बस स्टॅन्ड वरील पक्ष कार्यालयात आयोजन केले होते.
यावेळी पक्षाला मोठे योगदान देणारे व एका छोट्याश्या रोपट्याला कष्टाने वटवृक्ष रुपी भाजपा बनविन्यात हातभार लावणारे भाजपाचे जेष्ठ सदस्य,माजी मंडळ अध्यक्ष नरेंद्र जी सुरकार यांच्या हस्ते ध्वजारोहन करून भारतीय जनता पार्टी चा स्थापना दिवस कार्यक्रमाला सुरुवात केली.
या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनार्थ भाषनां नंतर जेष्ठ सदस्य नरेंद्रजी सुरकार,जेष्ठ सदस्य जनकजी पालीवाल, विनायकजी झीलपे, माजी मंडळ अध्यक्ष जयंतजी बडवाईक, माजी नगरसेवक संजयजी इटणकर,जेष्ठ सदस्य महादेवजी बोरकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रस्तविक माजी उपाध्यक्ष राजू गंधारे, संचालन जिल्हा सचिव स्नेहल कलोडे तर आभार पंकज पराते यांनी केले.
Bjpnews:यावेळी या कार्यक्रमाला जेष्ठ नेते पत्रकार आनंदजी छाजेड,जिल्हा सचिव प्रभाकरजी तडस,एकता युवा मंडळ चे नरेंद्रजी पेटकर,रामेश्ववरजी घंगारे, किशोरभाऊ भांदककर,रामभाऊ सोनटक्के,राजूभाऊ तेलरांधे,मिलिंदजी पेटकर,प्रभाकरराव तुमाने,गुल्लूभाऊ भंसाली,नरेंद्रजी सेलूकर, मोहन तळवेकर,राहुल सोरटे,अरुणराव ढेंगरे, वामनराव ढोक,चंपूभाऊ भंसाली,महिला मोर्चा च्या सौं. रोशनाताई पेटकर, सौं. वैशालीताई पेटकर,सौं. काटोले ताई व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.