गावातील युवकांनी त्या भिक्षुकाला पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन.
प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी
सिंदी (रेल्वे):-नागपूर मुंबई मार्गावरील सिंदी (रेल्वे) येथील रेल्वे स्टेशन लगतच्या वनविभागाच्या जागेवर
शेकडोंच्या संख्येने बांगलादेशी,रोहिंग्या समुदायाची वस्ती आहे. भीक मागणे, चोऱ्या, लूटमार करणे हा या समुदायाचा व्यवसाय. दिवसभर सिंदी( रेल्वे) स्टेशन वर या लोकांचा ठिय्या असतो.
येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी गाड्यांमध्ये अवैधपणे प्रवास करणे, रेल्वेत भीक मागणे, चोऱ्या करणे, हा यांचा नित्य व्यवसाय झाला असून भीक न देणाऱ्या प्रवाशांना शिवीगाळ करणे अर्वाच्य भाषेत बोलणे, मारायला जाणे, धमकी देणे हा यांचा नित्य क्रम झाला आहे.
या रोहिंग्या समुदायामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाला याआधी देखील ही बाब अवगत करून देण्यात आली होती परंतु रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केले.
२७ ऑगस्ट रोजी प्रीतम कलोडे रा. सिंदी (रेल्वे), येथील प्रवाशांवर रोहिंग्या भिकाऱ्यांच्या टोळक्याने इंटरसिटी एक्सप्रेस मध्ये जीवघेणा हमला केला. प्रीतम कलोडे इंटरसिटीने नागपूरला जात असताना लादेन रोहिंग्याचं टोळकं रेल्वेत घुसलं. त्यातील एका भिकाऱ्याने प्रीतम कलोडे यांना भीक मागितली.
त्यांनी भीक देण्यास नकार दिला. तेव्हा त्या रोहिंग्या भिकाऱ्याने त्यांच्या हाताला जोरात जावा घेतला त्यामुळे प्रीतम कलोडे रक्तबंबाळ झाला . त्यांच्या हातातून रक्त वाहू लागले. एवढेच नव्हे तर त्या रोहिंग्या भिकाऱ्याने त्यांना मारण्याची धमकी सुद्धा दिली. या घटनेची तक्रार लोहमार्ग रेल्वे पोलिस नागपूर येथे नोंदविण्यात आली.
सदर रोहिंग्या गावाचा बाजार असल्याने हा बाजारात फिरताना आढळून आला असता गावातील युवकांनी पकडून सिंदी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.
Breakingnews/लादेन रोहिंग्याचे सिंदी गावात दहशतीचे वातावरण आहे. रात्री बे रात्री रोहिंगे भिकारी चोरी करण्याच्या निमित्ताने गावात शिरतात. गावकऱ्यांनी अनेकदा पोलिस स्टेशन ,आमदार व खासदारांना या बाबत निवेदन दिले. मात्र रोहिंग्या विरुद्ध अजून पर्यंत कारवाई झालेली नाही