प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :- हिंगणघाट सीमेनजीकच्या ग्रामपंचायत आजंती हद्दीत येत असलेल्या मौजा कोल्ही(बोरगाव) या क्षेत्रात शहरातील राठी या उद्योजक परिवाराने मोठे गोदाम उभारले आहेत.
येथील हिंगणघाट नागपूर महामार्गावरील शेत. सर्वे. क्र. १०२ ज्याची आराजी १.६५ चौ. मी. आहे, हे गोदाम योगीता गोविद राठी व पदमा गोपालदास राठी यांचे नावे आहेत. दुसरे गोदाम शेत सर्वे क्र.१००/१ या ठिकाणी असून त्याची आराजी १.१४ चौ.मी आहे.
नितीन गोपालदास राठी यांचे नावावरती हे गोदाम आहे तर शेत सर्वे. नं ९९/२ वरती आराजी १.२७ चौ. मी. गोपालदास धनराज राठी यांचे नावे आहे.
शेत सर्वे क्र. ९९/३ गोविंद गोपालदास राठी यांच्या नावाने आहे याची आराजी १.२७ अशी आहे.
हिंगणघाट तालुक्यात मौजा नांदगाव येथे जिनिंग तसेच आईल मिल, वणी येथे कॉटन व जिनिग कंपनी तसेच काही वर्षा अगोदर हिंगणघाट येथिल मोहता गृपची कपडा मिलसुद्धा यांनी खरेदी केली आहे. एकीकडे काही कपंनीचे कोरोना काळात दिवाळे निघाले तर दुसरीकडे राठी परिवारासारख्या उद्योजकानी आपला पसारा वाढविण्यात यश प्राप्त केले आहे.
राठी परिवाराने अल्पावधीतच हिंगणघाट शहरातच नव्हे तर जिल्ह्यात व विदर्भात आणि राज्यातसुद्धा एक यशस्वी उद्योजक म्हणून पुढे आले. यांचे व्यवसाय मोठे यांचा हिशोबात 1 रुपया सुद्धा गडबड होत नाही यांचा हिशोब चार्टर्ड अकाउंटन्ट कडुन तपासण्यात येते.
परंतु अधिक माहिती घेतली असता यात मोठा भ्रष्टाचार असल्याचे सकृतर्शनी लक्षात येते,यांचे व्यवसायाशी निगडीत अनेक बाबी नुसत्या कागदावरच असतात परंतु प्रत्यक्षात काही वेगळेच असते.
मौजा कोल्ही (बोरगाव)हिंगणघाट नागपूर महामार्गावरील असलेले येथे तीन विशाल गोदाम उभारण्यात आले आहे याचे मालक राठी परिवारातील विविध सदस्य आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या गोडाऊनची परवानगी नाही इतकेच नाहीतर शेती अकृषक सुद्धा नाही. यांचा नावाने असलेले ७/१२ वरती अकृषक केल्याची कुठलीही नोंद नाही, तसेच उपविभागीय अधिकारी किंवा नगररचनाकार यांचे कडून बांधकामाची परवानगी नाही, साधी ग्रामपंचायतिचीही परवानगी नाही,
Brekingnews :सबंधित विभाग व जबाबदार कर्मचारी व अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ? झाल्याचे लक्षात येते.
त्यामुळे या ठिकाणी शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला असावा.
एकीकडे एक- एक रुपयाचा हिशोब ठेवणारे उद्योजक कर मात्र पद्धतशीरपणे बुडवितात.
या प्रकरणी सबंधित विभागाकडून दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार का ? असा सवाल या अनुषंगाने उपस्थित करण्यात येत आहे.