प्रतिनिधी सचिन वाघे
brekingnews/हिंगणघाट :- मौजा आंजती हद्दीत येत असलेला हिंगणघाट परीसरातील काहीभाग, तसेच रीमडोह, चिचघाट (राठी) कोल्ही (बोरगाव )जुनोना MIDC हा परीसर येतो. या परीसरात मोठ्या प्रमाणात औधोगिक व्यवसाय आहे.आजच्या तारखेला हिंगणघाट पंचायत समिती मध्ये सर्वात जास्त महसूल कर आंजती ग्रामपंचायत त्या नंतर नांदगाव ग्रामपंचायत आहे.
आंजती ग्रामपंचायतचा हिशोब घेतला असता सर्वात जास्त भ्रष्टाचार सुद्धा याच ठिकाणी सुरु आहे. आंजती ग्रामपंचायतला औद्योगिक व्यवसाय कर आकारणीतुन जास्त उत्पन्न मिळते आज या ठिकाणी औद्योगिक व्यवसाय कर आकारणी करतांना ग्रामपंचायत सचिव, स्थानिक सरपंच /सदस्य यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे आंजती ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले औद्योगिक व्यवसाय बांधकाम परवानगी नसतानाही कारवाई करण्याची हिम्मत करत नाही,
यामध्ये वरिष्ठ अधिकारी सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येते त्यामुळे या ठिकाणी चौकशी केल्यास अनेक औद्योगिक व्यवसाय कर तसेच अनेक व्यवसाय कागदोपत्री असल्याचे समोर येऊ शकते आज एकीकडे शासन अनाधिकृत
brekingnews/बांधकामावर बुलडोजर चालवत असतांना दुसरीकडे अशा विनापरवानगीच्या बांधकामाला अभय मिळत असल्याने यामध्ये वरीष्ठ अधिकारी यांचे आर्थिक हितसबंध गुंतले असण्याची शक्यता सर्वसामान्य जनतेतुन व्यक्त केल्या जात आहे.