जावेद शहा बुलढाणा
Buldhana :शा.प्र. दि. 25 नोव्हेंबर राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा, द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट रायपुर येथील 9 विद्यार्थ्यांचा चमू यवतमाळ येथे झालेल्या विभागीय शालेय कराटे स्पर्धेत सहभागी झाला होता.
वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)
यात 5 मुली व 3 मुले असे एकुण 9 खेळाडू सहभागी झाले होते. यात एका विद्यार्थिनीने विजय मिळवत तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यात 19 वर्षे वयोगटात सृष्टी किरण मोरे हिने चमकदार कामगिरी करत विजय मिळवला. या विजयाबरोबरच तिची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर शिवानी खंडागळे, साक्षी सोळंके, दिशा सुरडकर, पायल चिकटे, देवयानी सिरसाट, सोहम लोखंडे, शिंगणे व प्रेम ठाकूर यांना द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले.
Buldhana:या विजयाबद्दल संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके व शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्यां मुलीचे अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तर या विजयासाठी शाळेचे क्रिडा प्रशिक्षक भुषण सिरसाट यांनी मेहनत घेतली.