Buldhana news| समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष यांना जिवंत जाळून मारण्याची धमकी.

 

[ संबधितावर कारवाई व्हावी.महिला जिल्हाध्यक्ष यांची निवेदनाद्वारे मागणी. ]

Buldhana news : नशेच्या आहारी जावून अश्लील शिवीगाळ करून समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती उमाताई बोचरे यांना जिवंत जाळण्या प्रकरणी धमकी देणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई व्हावी अश्या प्रकारचे निवेदन आज नांदुरा पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की दि.3/01/ 2024 रोजी दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष यांना चांदुर बिस्वा रोडवर वडनेर भोलजी येथील गैरहजर अब्दुल हमीद अ, वासिद, वकीलखाॕ एहसखाॕ, रईस खा सब्बीर खा,अमजद बेग मिर्झा (उपसरपंच वडनेर भोलजी) यांनी गैरकारदेशीर मंडळी जमवून दारूच्या नशेच्या आहारी जावून अश्लील शिवीगाळ करून जिवंत जाळून मारण्याची धमकी दिली.

Akolanews | शिव सेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख दीपक पाटील दांदळे यांनी मुर्तीजापुर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या होत असलेल्या गैरसोयी बाबत विभागीय रेल्वे प्रबंधकांशी बोलून सोडविल्या समस्या..

तसेच वडनेर भोलजी येथील समाज वादी पार्टीचे कार्यालय व मला जिल्हाध्यक्ष सहित आग लावून आम्ही वर्चस्व टिकू देणार नाही. तसेच ऑफिसमध्ये बसल्यास त्यांना इशारे करून म्हटले की स,पा.वाले हमारा क्या बाल उखाडेंगे! यामुळे पवित्र चा भंग होतं आहे.

Buldhananews: तरी संबधितावर कारवाई अशी मागणी महिला जिल्हा आध्यक्षा उमाताई बोचरे यांनी दिलेल्या निवेदनातून केली असून त्याच्या प्रती वरीष्ठ अधिकारी यांना पाठविल्या आहेत.

Leave a Comment