महाराष्ट्र पोलीस दिनानिमित्त जिजाऊ ज्ञान मंदिरात पोलीस स्टेशन रायपूरच्या वतीने कार्यक्रम संपन्न (buldhananews)

0
16

buldhananews:प्र.श. 7 जानेवारी राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु कॉलेज पळसखेड भट मध्ये दिनांक 7 जानेवारी 2025 वार मंगळवार ला पोलिस स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी श्री शिवाजी हायस्कूल रायपुर येथील स. शिक्षक गजानन जाधव कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर प्रमुख मार्गदर्शक व अतिथी म्हणून मा. दुर्गेश राजपूत ठाणेदार रायपूर पोलीस स्टेशन व सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एम सोनुने, शिक्षक प्रदिप जाधव, तुळशीदास आकाळ, सोमनाथ नप्ते यांची उपस्थिती होती.

बिबी येथे भाजपा युवा मोर्चा च्या वतीने सदस्य नोंदणी(Lonar)

सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट येथे ‌मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी ठाणेदार मा. दुर्गेश राजपूत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, समाजामध्ये शांतता प्रस्तावित व्हावी यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला जातो.

संपूर्ण भारतामध्ये उत्कृष्ट काम महाराष्ट्र पोलीस यांचे आहे. आपण विद्यार्थ्यांनी पोलीस खात्यामध्ये रुजू झाले पाहिजेत. यादरम्यान प्रामुख्याने रस्ता सुरक्षा, सायबर क्राईम व लैंगिक शिक्षणाचा अभाव या तिन बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. समाजामध्ये फेसबुक इन्स्टा व सोशल मीडियाच्या माध्यमातून कशाप्रकारे सायबर गुन्हे घडतात व नकळत कमी वयाच्या विद्यार्थ्यांकडूनही कशाप्रकारे एखादी पोस्ट शेअर केल्याने गुन्हा घडू शकतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तसेच रस्ता सुरक्षा च्या बाबतीत जर कुठले वाहन आपल्या घरचे पालक किंवा आजूबाजूला कोणी चालवत असेल तर त्यांनी हेल्मेटचा वापर केला पाहिजे, जेणेकरून अपघात घडल्यास जीव वाचू शकतो.

तसेच आज सगळ्यात जास्त घडणारे गुन्हे म्हणजे या वादळी अशांततेच्या वयातील मुले-मुली यांचे विरोधी आकर्षण! 15 ते 18 या वयोगटातील तुम्ही सर्व विद्यार्थी आहात. मुलांमध्ये परस्पर विरोधी आकर्षण असतं व त्या माध्यमातून मुले आई-वडिलांचा विचार न करता चुकीचे पाऊल उचलतात व गुन्ह्यास बळी पडतात. हे करत असताना आपण आई-वडिलांचा निश्चित विचार करावा. ज्ञानाचे क्षेत्र खूप मोठे आहे. त्यामुळे केवळ एका गोष्टीकडे आकर्षित होऊन आपण आपलं संपूर्ण आयुष्य पनास लावू शकत नाही. म्हणून आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करा. तुम्हाला खूप वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्याच्या संधी आहेत.

buldhananews:पहिल्यांदा आपण त्याचा विचार केला पाहिजे. आई-वडिलांचा विचार केला पाहिजे आणि परिपूर्ण माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे आपल्या भाषणात ठाणेदार साहेब म्हणाले.
कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. व श्री शिवाजी हायस्कूल रायपुर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानेश्वर भुसारी यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here