अवकाळी’ ग्रस्त ब्याऐंशी कुटुंबांना किराणा किटचे वाटप! वन बुलढाणा मिशनचा पुढाकार  ( buldhananews )

 

बुलढाणा: अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका बसलेल्या ८२ बाधित परिवाराना ‘वन बुलढाणा मिशन’ तर्फे किराणा किट चे वाटप करण्यात आले.

वादळी अवकाळी पाऊस आणि गारपीट ने संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांत हजेरी लावली. याचा फटका रब्बी पिकांना बसला.

तसेच काही घरांवरील टीनपत्रे उडाली तर काही घरांत अवकाळीचे पाणी घुसल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले.

वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने किराणा किट वाटप करण्याच्या सूचना स्वयंसेवकांना दिल्या.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

buldhananews:त्यानुसार एकलारा, बानोदा, धामणगाव, गोतमारे यासह अनेक गावातील ८२ गरजू कुटुंबीयांना किराणा कीटचे वितरण केले. यामध्ये रोजच्या दैनंदिन वापरातील साखर, तेल, मिरची पूड आदी पदार्थांचा समावेश आहे.

Leave a Comment