शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत शेतातून जाण्याच्या कारणावरून चुलत भावा मध्ये हाणामारी.. परस्पर विरोधी तक्रारीवरून दोघा विरुद्ध गुन्हा दाखल..

 

इस्माईल शेखबुलढाणा .जि.प्र.

शेगाव: ग्रामीण पोलीस स्टेशन शेगावच्या हद्दीत येणाऱ्या गव्हाण तालुका शेगाव येथे शेतातून जाण्याच्या कारणावरून दोघांमध्ये हाणामारी झाल्या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गजानन ज्ञानदेव कंकडे वय 55 वर्ष राहणार गव्हाण तालुका शेगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून संतोष किसन कंकाळे विरुद्ध अप नं 295/2023 कलम 324 504 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सुशीला संतोष कंकाळे वय 38 वर्षे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गजानन ज्ञानदेव कंकाळे विरुद्ध अपराध नंबर 296 ऑब्लिक 2023 कलम 324 504 506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगावकर साहेब यांच्या आदेशाने अधिक तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे भेट जमदार पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण मेटांगे साहेब बकल नंबर 850 करीत आहेत..buldhananews

Leave a Comment