विवाहितेचा मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरकडील पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल..crimenews

 

 

इस्माईल. शेख बुलढाणा .जि.प्र.

जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील दुधाने व काना येथील विवाहितेचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मृतक विवाहितेच्या पती सासू-सासरे व दोन ननंदअशा पाच जणां विरुद्ध जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची तक्रार मृतक विवाहितेची बहीण सौ. नेहा अश्विन जाधव वय 26 वर्ष यांनी दिल्यावरूनआरोपी – पती 1. रवि प्रल्हाद उगळकार 2. सासरे प्रल्हाद उगळकार, 3. सासु पार्वताबाई उगळकार, तिन्ही रा. रुधाणा वकाना, ता. संग्रामपुर, 4 नणंद सौ. माया वेरुळकार रा. उकळी बाजार, ता. तेल्हारा, 5. नणंद सौ. छाया मोहन भड़, रा. तळेगाव बाजार, ता तेल्हारा. घटनास्थळ – खेर्डा बु ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा विरुद्ध कायमी अप क्र 645/2023 कलम 304 ब, 306, 323, 34 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास तपास अधिकारी – मपोउपनि रंजना आवारे करीत आहेत crimenews

Leave a Comment