जिवती येथे आदिवासी नेते स्व. गोदरू पाटील जूमनाके यांच्या तृतीय स्मृती दिनाप्रित्यर्थ पुतळ्याचे अनावरण

 

कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

जिवती या दुर्गम आदिवासी तालुक्यातील आदिवासी नेते स्व.गोदरू पा.जुमनाके यांच्या तृतीय पुण्यतिथी प्रित्यर्थ जिवती येथे गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्थेचे प्रंगणात समाज प्रबोधन मेळावा व पुतळ्याचे अनावरण (दि.18 डिसेंबर) रोजी कारण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार सुदर्शन निमकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष करण पुगलीया, नगराध्यक्ष सौ.कविता आडे, प्रमुख अतिथी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष आरजू सीडाम, हरीशजी उईके, बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, सामाजिक कार्यकर्ते आबीद अली, माजी जि.प.सदस्य शिवचंद्र काळे, कामगार नेते वसंत मांढरे, संचालक निशिकांत सोनकांबळे

, प्रा. संभाजी वारकड, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सोमाजी गोंडाणे, नगरसेविका श्रीमती सतलुबाई गोदरु पाटील जुमनाके, गोंडवाना संस्थेचे अध्यक्ष गजानन जुमनाके, सचिव बापूराव मडावी, विमाशीचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, प्रा.डॉ.प्रकाश वट्टी, प्रा.लक्ष्मण मंगाम, भीमराव पा.मडावी, प्रदिप बोबडे सह मान्यवर तथा हजारोच्या संख्येने समाज बांधव व जनसमुदाय तथा पाटलांचे हितचिंतक उपस्थित होते

Leave a Comment