Buldhana Crime : मतिमंद मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावास

 

 

Buldhana Crime : मतिमंद मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावास

बुलडाणा – येथील मतिमंद मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. व बुलडाणा येथील जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी हा निकाल दिले आहे.

अधीकृत माहिती तुन बुलडाणा जिल्हातील पळसखेड येथील एका मतिमंद मुलगी तिच्या आईसोबत राहत होती. अचानक नातेवाईक मरण पावल्याने आईला बाहेरगावी जावे लागले. व त्यावेळी मतिमंद पीडीता मुलगी ही घरी एकटीच राहत होती.

परंतु ती पायवाटेने बाहेर जात असताना गावातील नितीन प्रेमसिंग राठोड हा तिच्या मागे मागे गेला व अचानक पणे तिचा हात धरून तिला नेऊ लागला. यावेळी तिने आरोपीला झटका देऊन ती त्या ठिकाण वरून पळून आली. व पिडीतेने घडलेली घटना तिच्या नातेवाईक व काकूला सांगितली व दुसऱ्या दिवशी आई परत आल्यानंतर आईजवळ संपूर्ण माहिती सांगितली.

यावरून मुलीच्या आईने 3 ऑगस्ट 2020 रोजी बुलडाणा ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी यावेळी पोक्सो कायद्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केले.

या संपूर्ण प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक सुनील रामराव दौड यांनी आरोपी विरुद्ध पुरावा आढळल्याने दोषारोपपत्र बुलडाणा जिल्ह्यात दाखल केले. सदर प्रकरण विशेष सरकारी वकील संतोष खत्री यांच्याकडे सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी सोपविण्यात आले त्यानंतर.

या संपूर्ण प्रकरणांमध्ये सात साक्षीदार तपासण्यात आले. व सदर मुलगी मतिमंद असल्याची जाणीव पूर्वक आरोपीला असतानाही त्याने तिचा सोबत विनयभंग केला.

https://www.suryamarathinews.com/reservation/

 

ही बाब न्यायालयाला पटवून दिली व साक्षीपुरावांच्या आधारे गुन्हा सिद्ध होत असल्याने न्यायाधीशांनी उपरोक्त निकाल दिला. परंतु या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अँड संतोष खत्री यांनी काम पाहिले व कोर्ट पैरवी पोलीस हेड कॉन्स्टेबल बोरकर व बंगाळे यांनी त्यांना सहकार्य केले. Crimenews

Leave a Comment