सिंदखेडराजा सुरेश हुसे
देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यातील देऊळगाव राजा पोलीस स्टेशन सिंदखेडराजा पोलीस स्टेशन व किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत वरली मटका अवैध देशी दारू यांना उत आला.
असून हे धंदे तात्काळ बंद करण्यासाठी छावा संघटनेच्या वतीने दिनांक 12 नोव्हेंबर 20 नोव्हेंबर 2023 व 8 डिसेंबर 11 डिसेंबर 2023 रोजी अवैध धंदे बंद करण्यासाठी अर्ज सादर करूनही अद्याप अवैध धंदे बंद करण्यात आले नसल्याने झोपलेल्या पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी आज तारीख 22 डिसेबर रोजी सिंदखेडराजा ताहसीलदार व सिंदखेडा पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
असून सदर निवेदनात असे म्हटले आहे की देऊळगांवराजा पोलीस स्टेशन सिंदखेडराजा पोलीस स्टेशन व किनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे 25 डिसेंबरच्या आत बंद करून संबंधित बिट जामदार वर कारवाई न केल्यास छावा संघटनेच्या वतीने सिंदखेडराजा येथील छत्रपती शिवाजीनगर टी पॉईंट समोर दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल याला.
सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे सदर निवेदनावर बजरंग काळे बहुजन पँथर युथ तालुकाध्यक्ष, बाळासाहेब शेळके विधानसभा अध्यक्ष, अशोकरावजी जाधव जिल्हाध्यक्ष,गोविंद टेके, संजय उगले, यांच्या स्वाक्षरीआहे chhawa sanghatna