Home बुलढाणा Crimenews /मी जिवंतच माझ्या वडील व भावाला निर्दोष सोडा_ शिवानी कळमेकर

Crimenews /मी जिवंतच माझ्या वडील व भावाला निर्दोष सोडा_ शिवानी कळमेकर

0
2

 

राजुरा खून प्रकरणाला वेगळे वळण

जळगाव जामोद _तालुक्यातील राजुरा धरण परिसरात दिनांक 26 एप्रिल रोजी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता

 

मृतदेहापासून काही फुटावर महिलेचा शिरही होतं या प्रकरणी तात्काळ माहिती मिळाल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक लोढा, डीवायएसपी महाजन, स्थानिक गुन्हे शाखा पथक,ठाणेदार नितीन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली व फॉरेन्सिक विभागाची टीम बोलावून या सर्व प्रकरणाचा तपास एलसीबी पथकाने केला व मध्य प्रदेशातील खडकी गावातील शिवानी बापूराव कळमेकर ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार मध्य प्रदेश पोलिसात दाखल झाली होती,policenews

एलसीबी पथकाने तिच्या वडील व भाऊ यांची चौकशी केली असता तिच्या वडिलांनी व भावाने तिची हत्या करून मृतदेह महाराष्ट्रातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरा धरणातआणून टाकला होता अशी कबुली दिली होती याप्रकरणी आपल्या मुलीच्या हत्येचा आरोप ठेवत बुलढाणा पोलिसांनी शिवानी कळमेकर चे वडील बापूराव कळमेकर व भाऊ यांना अटक करून कारागृह मध्ये ठेवले आहे ,मात्र शिवानी कळमेकर हिने बुऱ्हाणपूर पोलीस स्टेशन गाठत थेट मी जिवंत असून माझ्या हत्येच्या गुन्ह्यात माझ्या वडिलांना भावाला पोलिसांनी जेलमध्ये ठेवलं असल्याचा कबुली जबाब दिला आहे.breakingnews

त्यांना निर्दोष सोडून देण्यात यावे अशी मागणी केली आहे, शिवानी कळमेकर ही जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे, व जळगाव जामोद पोलिसांकडून सुद्धा तिची चौकशी चालू आहे,मात्र ज्या महिलेचा मृतदेह सापडला होता ती नेमकी कोण हा प्रश्न उपस्थित राहत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here