–प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता!
बुलढाणा : बुलढाणा पालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना कुणालातरी पराभव पाण्यात दिसतोय का?
असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, घटनाच तशी घडली, शहरातील मुस्लिम बहुल भागात काँग्रेस पक्षाच्या फलकाला काळे फासण्यात आल्याचे सोमवारी सकाळी निदर्शनास आले.
Congress news/तेलगू नगर चौकातील एका घरावर रीतसर परवानगी घेऊन लावण्यात आलेल्या फलकावर काळे ऑइल टाकून विटंबना करण्यात आली असून, विरोधकांना आपला पराभव पाण्यात दिसत असल्याची चर्चा काँग्रेस मधील कार्यकर्त्यांमधून होत आहे.








