courtnews / दोन बालकांचा मृत्यू – आरोपी सागर फुंडकर याला जामीन दिल्याने समाजातील विविध स्तरांत नाराजी

0
771

 

courtnews:(दि. ९ मे २०२५) माऊली फाटा येथे शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालवणाऱ्या टिप्पर चालक सागर फुंडकर याच्या बेजबाबदारपणामुळे दोन निरागस बालकांचा मृत्यू झाला, तर दोन प्रौढ गंभीर जखमी झाले आहेत.

विशेष म्हणजे, एवढ्या गंभीर प्रकरणातही आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला असून त्यामुळे समाजातील विविध स्तरांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

RapeNews /  डॉ.गोयनका यांच्या विश्वत्रिवेणी टेक्सटाइलमध्ये किशोरवयीन मुलीवर बलात्कार..

प्रकाश महादेव खेडकर (वय 60) व साधना प्रकाश खेडकर (वय 55, रा. पळशी सुपो, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) हे मोटारसायकल वरून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत पार्थ अक्षय चोपडे (वय 6, रा. राजापेठ, अमरावती) व युवराज मोहन भागवत (वय 5, रा. जुनी वस्ती, बडनेरा, अमरावती) ही दोन बालके होती. अपघातात दोन्ही बालकांचा जागीच मृत्यू झाला.

सागर फुंडकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे. या निर्णयामुळे मृतक बालकांचे नातेवाईक संतप्त झाले असून, त्यांनी आज जळगाव येथे जाऊन काही वकिलांची भेट घेतल्याची माहिती ‘दैनिक देशोन्नती’च्या जळगाव जामोद प्रतिनिधीस मिळाली आहे. त्यांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात कायदेशीर पर्यायांचा विचार करण्यास सुरुवात केली आहे.

courtnews / दोन बालकांचा मृत्यू – आरोपी सागर फुंडकर याला जामीन दिल्याने समाजातील विविध स्तरांत नाराजी

courtnews:दरम्यान, या प्रकरणातील तपास अधिकारी शेंडगे मॅडम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन सतत नॉट रिचेबल येत आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल्या संदेशांनाही त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. पत्रकारांना माहिती न मिळाल्याने अधिकच संभ्रम व नाराजी निर्माण झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here