प्रतिनिधी सचिन वाघे
Policenews /वडणेर : अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने हिंगणघाट परिसरात धडक मोहिम राबवली. दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा सोनेगाव येथील एका टायर पंचर दुकानावर छापा टाकण्यात आला.
या कारवाईत साकिर फिरोज अन्सारी हा आपल्या दुकानातून गांजाची अवैध विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. झडतीदरम्यान आरोपीकडून 566 ग्रॅम गांजा, विक्रीतून मिळालेली ₹7,850 रुपये नगदी, गांजा वाहतुकीसाठी वापरलेली पल्सर 220 मोटरसायकल (MH-49/BP-2187), तसेच मोबाईल असा एकूण ₹1,79,170/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
Crimenews /ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पो.उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडु, पो.अं. अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक (स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा) यांनी संयुक्तपणे केली.








