इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव: एका 45 वर्षीय महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून “तू मला आवडतेस” असे सांगून विनयभंग करणाऱ्या आरोपी विरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडितेने शेगाव शहर पोलीस स्टेशन तक्रार दिली की लहुजी वस्ताद चौका जवळ कटलरीची दुकान लावणाऱ्या श्याम गजानन चांदुरकर याने 45 वर्षीय महिलेचा वाईट उद्देशाने “तू मला आवडतेस” असे सांगितल्यावर मी आरडाओरड केली.
त्यावेळेस ओरडू नको असे सांगून काठी उचलून मारण्याची धमकी दिली अशा तोंडी तक्रारीवरून आरोपी शाम गजानन चांदुरकर विरुद्ध 354, 354 (1) 344 427 506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://www.suryamarathinews.com/sindhujadhav/
अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील आंबुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे एएसआय गजानन गावंडे बकल नंबर 699 पोलीस कॉन्स्टेबल गजानन डाबेराव करीत आहेत crimenews