शेवटी जिवन तोगरे याला न्याय मिळाला सिंधू जाधव हिला अँट्रॉसिटीच्या गुन्हात पोलिसांकडून अटक …. Sindhujadhav 

====================
कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी.
====================
जिवती –
पिट्टीगुडा उप पोलीस स्टेशन चे हद्दीत रुग्णसेवक जिवन राजाराम तोगरे रा.पाटागुडा याचा संशयास्पद मृतदेह 4 जून 2023 रोजी शेणगाव ते मरकागोंदी रोडचे बाजूला शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळ्यामुळे घटनास्थळीच पोस्टमार्टम करण्यात आले होते. मृत्यूबाबत तालुक्यात तसेच समाजात तर्क वितर्क लावले जात होते.

त्यामुळे याप्रकरणाचा तपास पिट्टीगुडा पोलिसांकडून जिवती पोलिसांकडे देण्यात आला. मृतकाचे नातेवाईकांनी घातपाताचा आरोप करून जिवन ला न्याय देण्यात यावा या करिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते.

https://www.suryamarathinews.com/shivsena/

त्यावरून जिवती पोलिसांनी सखोल तपास करून सिंधू जाधव हिला ऑॅट्रॉसिटीच्या गुन्हात अटक केली.असून पुढील तपास डिवाय एसपी गडचांदूर हे करणार आहेत.Sindhujadhav

Leave a Comment