इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव: एका 37 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी भूत बंगला परिसरात राहणाऱ्या आरोपी विरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एका 37 वर्षीय विवाहितेने शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
की मी 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजे दरम्यान माझ्या मुलाला ट्युशन वर घेऊन जात असताना आरोपी जुनेद रहमतुल्ला खान वय 33 वर्षे राहणार भूत बंगला परिसर याने आप हमसे मोहब्बत करे या ना करे हम आपसे मोहब्बत करेंगे असे म्हणून 37 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केला.
सदर प्रकार विवाहितेने तिच्या पतीला सांगितल्यावर पिडितेचा पती आरोपीला समजावण्यासाठी गेला असता आरोपी जुनेद रहमतुल्ला खान याने पिडितेच्या पतीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
( Crimenews )37 वर्षीय विवाहितेचा विनयभंग,
या तक्रारीवरून आरोपी जुनेद रहमतुल्ला खान वय 33 वर्षे राहणार भूत बंगला परिसर शेगाव विरुद्धअप न 648/23कलम 354 ड,504.506 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crimenews याबाबत अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीसपोनी इंगोले साहेब पोस्टे शेगाव शहर हे करीत आहेत