सातपुड्यात आदिवासी युवकाची आत्महत्या पिंगळी जगल क्षेत्रातील घटना (crimenews )

0
3

 

 

crimenews: सातपुड्यात अंबाबरवा व्याघ्र अभयारण्य आहे. त्यातील पिंगळी हे बफर जंगल आहे.

या जंगल क्षेत्रात एका ३० वर्षीय आदिवासी युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार २१ जानेवारीच्या सकाळी ९ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे.

आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव दिनेश झिना बोंडळ असे आहे. तो लगत असलेल्या पुनर्वसित आदिवासी गाव शेंबा (रोहिणखिडकी) येथील रहिवाशी आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

 

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

जोखलाल मुकुंद बोंडळ वय ४०वर्षे यांचे फिर्यादीवरून सोनाळा पोस्टेमध्ये मर्ग नं ०३ /२४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत हकीकत अशी की, पंडू कालूसिंग चव्हाण रा. गुंमठी हा वनमजूर पिंगळी जंगलात सकाळी ८ वाजता गस्त करित असतांना बफर क्षेत्रातील कंपार्टमेट नं. ४५४ मध्ये दिनेश बोंडळ हा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळून आला. असे फिर्यादीत नमूद आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

crimenews:मृतकास दोन जूळे मिळून ४ अपत्ये आहेत. त्याने एका मुलीस पळून आणले असल्याची चर्चा होत आहे. त्यातूनच ही घटना घडल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here