ऑनलाईन फसवणूक प्रकरणी मध्यप्रदेशातून दोघांना अटक,आरोपींना 8 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी ( Crimenews )

 

Crimenews:बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एकाची ऑनलाईन दोन लाख 4 हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणात बुलढाणा सायबर पोलिसांनी मध्यप्रदेशातील इन्दूर आणि भोपाळ येथून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त केले आहे.

न्यायालयाने आरेपींना 8 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.चंदा मनोज सोळंकी (42, रा. इन्दूर) आणि तरुण पंकज खरे (रा. भोपाळ) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

खामगाव येथील दाल फैलमध्ये रहाणारे जय रविंद्र किलोलिया यांनी या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

१२ ऑक्टोबर रोजी त्यांना जीमेल अपडेट करण्याच्या बहाण्याने एक फोन आला होता. सोबतच व्हॉटस्अपवर त्यांना एक लिंक टाकण्यात आली होती.

अजब गजब पतीच्या निधनानंतर सून सासऱ्याच्या प्रेमात पडली; नेमक घडलं असं की शेवटी प्रकरण पोलिसांत पोहोचले ( love story )

त्याद्वारे आरोपींनी त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवत ॲक्सीस बँकेच्या त्यांच्या खात्यातून २ लाख ४ हजार रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली होती.

सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी तपासाची चक्रे फिरवून तांत्रिक माहिती संकलीत केली. त्या आधारे सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस हेडकॉन्स्टबेल शकील खान, कुणाल चव्हाण, राजदीप वानखडे, विक्की खरात, संदीप राऊत सहाय्यक फौजदार सायरा शाह यांच्या पथकाने तपास केला. आरोपी चंदा मनोज सोळंकी आणि तरुण पंकज खरे यांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले.

 

Crimenews : त्यांच्याकडून २ मोबाईल जप्त करण्यात आले. या आरोपींना अटक करून 5 फेब्रुवारीला खामगाव न्ययालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना ८ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी आज 6 फेब्रुवारीला दिली आहे.

Leave a Comment