घरकुला पासून यावल तालुक्यातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद( gharkul yojana )

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

gharkul yojana: 6 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावल येथील नगर परिषदेच्या सभागृहात तालुक्यातील सर्व विभागांची आढावा बैठक घेतली त्यामध्ये महसूल पंचायत समिती वनविभाग निवडणूक विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती होती .

महसूल बाबतीत माहिती सांगताना बल्क साईन डिजिटल नोंदी 100% पूर्ण करणारा यावल तालुका अव्वल ठरला आहे .बल्क साइन डिजिटल करण्यासाठी कोतवाल यांनी रात्रंदिवस मेहनत करून हा डाटा शंभर टक्के पूर्ण केला आहे तसेच वसुलीमध्ये देखील यावल तालुक्याचे काम योग्य प्रकारे सुरू आहे .

अजब गजब पतीच्या निधनानंतर सून सासऱ्याच्या प्रेमात पडली; नेमक घडलं असं की शेवटी प्रकरण पोलिसांत पोहोचले ( love story )

विशेष करून निवडणुकी संदर्भात सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच तालुक्यातील आंबापाणी या गावांमध्ये जाण्यायेण्यास कोणतीही सुविधा नसल्यामुळे दहा मोटरसायकली उपलब्ध करून देण्यात येणार आहे .

तसेच मतदानाची आकडेवारी घेण्यासाठी ( रनर्स ) ड्रोन ठेवण्याचे देखील प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले . भारत निवडणूक आयोगाच्या आदेशा मार्फत ५०% मतदान केंद्रामध्ये लाईव्ह व्हेब कांस्टिंग करणार असुन त्याचे तिन लिंक जिल्हा स्तरावर राज्य आणि भारत निवडणुक आयोगा कडे जाणार आहे .

तसेच मतदान यादी मध्ये काही चुकीचे नाव नोंदणी झालेले असेल किंवा चुकून कोणाचेही नाव डिलीट करण्यात आलेले असेल त्याबाबत खात्रीपूर्वक माहिती घ्यावी तसेच मतदान केंद्र बाबत काही अडचण असेल तसेच सुविधेमध्ये अभाव असेल त्याबद्दल देखील माहिती सांगण्यात यावी.

तसेच यावल तालुक्यातील घरकुला संदर्भात काही ग्रामपंचायतींनी जागा मागणीसाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत परंतु मोजणी रक्कम भरली नसल्याने जागेसाठी अडचणी निर्माण होत आहे परंतु घरकुला पासून यावल तालुक्यातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत व विनामूल्य जागा कशी उपलब्ध करून देता येईल याचे सुद्धा प्रयत्न सुरू आहे .

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

gharkul yojana: या आढावा बैठकीमध्ये यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर पंचायत समिती गट विकास अधिकारी डॉं मंजुश्री गायकवाड तसेच विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Comment