संत नगरीत महिला झाल्या कालिंका माता.गैरवर्तन कणाऱ्यास धू धू धुतले! गळ्यात चपलेचा हार टाकून केला ‘सत्कार’ !! धिंड काढत पोलिस स्टेशनला नेले..( crimenews )

 

( crimenews )शेगाव: प्रशिक्षण साठी येणाऱ्या महिला व मुलींशी गैरवर्तन करून छेडछाड करणे एका प्रौढ व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले! त्या आंबट शौकिनाला युवती व महिलांनी चांगलेच धुतले व त्याला चपलेचा हार टाकल्याची घटना घडली

 

याचे ‘व्हिडिओ आता वेगाने सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्याला नेटकरींचे भरपूर लाईक्स मिळत आहेत. त्याला चांगलाच धडा शिकविल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


ही विचित्र व आया बहिणीवर बुरी नजर ठेवणारी ही विकृत व्यक्ती बुलढाण्याच्या शेगाव शहरातील आहे.
त्याचे संतनगरीत प्रशिक्षण केंद्र आहे.

तिथे येणाऱ्या महिला मुलींशी हा व्यक्ती अश्लील वर्तन करून छेडछाड करत होता. मात्र इज्जत आणि भीतीपोटी महिला मुली समोर येत नव्हत्या. एका धाडसी युवतीने मात्र काही महिलांसह त्याला भर रस्त्यात बदडले! चपलेचा हार टाकून त्याला पोलीस स्टेशन पर्यंत नेले.

मात्र संबंधित व्यक्तीच्या पत्नी आणि कुटुंबातील व्यक्तींनी विनंती करून, पोलिसांनी त्याला समज देत, पुन्हा अशी चुकी करणार नाही असे स्टॅम्प पेपर वर लिहून घेतले. ,यामुळे गुन्हा दाखल झाला नसला तरी माया बहिणींनी त्याला चांगलीच शिक्षा केली आहे.

आता प्रतिक्षा संपली! शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता या महिन्यात होणार शेतकऱ्यांचे पैसे जमा ( PM Kisan Yojana )

crimenews:व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असल्याने त्यांच्या इज्जतीचा भाजीपाला झाला व होत आहे.

Leave a Comment