तू मला आवडते असे म्हणून 32 वर्षीय तरुणीचा विनयभंग करणाऱ्या गुरुदेव ड्रायव्हिंग क्लासचे संचालक ज्ञानेश्वर कुकडे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल.( Crimenews )

गुन्हा दाखल होऊ नये म्हणून अनेकांनी केलेले प्रयत्न निष्फळ..

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी


शेगाव: तू मला आवडतेस असे म्हणून फोर व्हीलर चालविणे चा प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या 32 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहरातील प्रख्यात गुरुदेव ड्रायविंग क्लासेसचे संचालक ज्ञानेश्वर कुकडे यांच्या विरोधात पिडी तेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलीस स्टेशन सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार 32 वर्षीय पीडिता हिने आरोपी ज्ञानेश्वर कुकडे यांच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये फोर व्हीलर वाहन चालविणे चे प्रशिक्षण घेण्यासाठी क्लास लावलेला होता.

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून शेगावचे नवीन तहसीलदार साहेब.यांचा सत्कार (Tahsildarnews )

आरोपी ज्ञानेश्वर कुकडे यांच्याकडे असलेल्या हुंडई कंपनीच्या फोर व्हीलर गाडी शिकवीत असताना आरोपीने फिर्यादी पिढी ते सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला पिढीतेच्या नको त्या ठिकाणी स्पर्श करीत असल्याने पीडीतेने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला सदर बाप पिढीतेने स्वतःच्या आई-वडिलांना सुद्धा सांगितली मात्र बदनामी होऊ नये.

याकरिता पिढीतेने आज पर्यंत यासंबंधी पोलीस स्टेशनला तक्रार दिली नव्हती 3 फेब्रुवारी रोजी पिढीतही संध्याकाळी साडेपाच वाजे दरम्यान आरोपीच्या ड्रायव्हिंग क्लास समोरून जात असताना आरोपी ज्ञानेश्वर कुकडे याने पीडीतेचा पाठलाग केला व अश्लील हातवारे केले जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सुद्धा पिढीतेच्या नको त्या ठिकाणी स्पर्श करून तू मला आवडतेस असे सांगून पिडीतेचा विनयभंग केला अशा तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल कुकडे वय 45 राहणार जिजामाता नगर शेगाव विरुद्ध अपराध नंबर 73/24 कलम 354 अ 354 509 भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय कर्डिले बक्कल नंबर 12 75 व हेडकॉन्स्टेबल निलेश तायडे हे करीत आहेत..

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Crimenews:विशेष म्हणजे सदर प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये याकरिता काही दिवसापूर्वी शहरातील राजकीय क्षेत्रातील व पत्रकारितेतील काही महाभाग यांनी प्रयत्न केले मात्र त्यांचे हे प्रयत्न निष्पर ठरल्याची चर्चा आज शेगाव शहरात होत होती

Leave a Comment