Crimenews:डोणगाव प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर स्थानिक गुन्हे शाखा व डोणगाव पोलिसांच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई केली.
आज, दि. २७ मार्च रोजी सकाळी समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली हे वाहन पकडण्यात आले. या कारवाई एकूण २१ लाख ९० हजार ८३२ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून गुन्हा दाखल केला.
ManojJarange / मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली: बीडमधील मेळाव्यात रुग्णालयात दाखल
आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास मजार खान अफसर खान (रा. साखरखेर्डा) हा मालवाहू पिकअप वाहनातून (क्रमांक एमएच ०४ -एचडी १४६२) अमडापूर येथून डोणगाव येथे प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमडापूर येथील कमळजा देवीच्या मंदिराजवळ गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला.
Crimenews / बुलडाणा जिल्ह्यात चाललं तरी काय?अबब १६ लाखांच्या गुटख्याची वाहन पकडले एवढं गुटका येते तरी कुठून???
त्यावेळी पिकअप वाहनाने तेथून पळ काढत पथकाला गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठलाग करत असताना हे वाहन जानेफळ मार्गे डोणगावच्या दिशेने जात असल्याने पाठलाग करणाऱ्या पथकाने डोणगाव पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली.
Crimenews:या दरम्यान डोणगाव पोलिस समृद्धी महामार्गाजवळ पोहोचण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महामार्गाच्या पुलाखाली या पिकअप वाहनाला अडविले. कारवाईनंतर वाहन डोणगाव पोलिस ठाण्यात आणून तपासणी करण्यात आली.