अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.
बुलढाणा:-गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अनधिकृतपणे गृहप्रवेश,घरफोडीचा प्रयत्न व संभाव्य जीविताला धोका असल्याने निवेदन कर्त्याचे रक्षण होण्याबाबत.
तक्रार जितेंद्र देवचंद कायस्थ पत्ताः शिव शॉपिंग कॉम्प्लेक्स, कारंजा चौक, बुलढाणा,व्यवसायः केबल नेटवर्क व पत्रकार यांनी शहर पोलिस निरीक्षक बुलढाणा यांना सादर केले आहे.
तक्रार करताना निवेदनात म्हटले आहे.
की,मी खालीलप्रमाणे तक्रार दाखल करीत आहे की,मी शिव शॉपिंग कॉम्प्लेक्स, कारंजा चौक,बुलढाणा येथे माझ्या परिवारासह राहतो. माझे दोन फ्लॅट असून मी दुसऱ्या मजल्यावर राहतो. पहिल्या मजल्यावर संजय कुलकर्णी राहतात व त्यांच्या फ्लॅटसमोर व्यापारी मीटिंग हॉल आहे.
दिनांक 26 मे 2025 रोजी दुपारी अंदाजे 1.00 ते 1.30 दरम्यान चार अज्ञात गुंड प्रवृत्तीचे इसम परिसरात आले.त्यातील एक इसम शर्मा आरो सेंटर येथे थांबून पार्किंगमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली.
त्याला केमेरा दिसताच तो तेथून निघून गेला.त्या आलेल्या अज्ञात इसमान पैकी बाजूलाच असलेल्या बंद श्रीराम हॉटेलच्या पायऱ्यांवर चढला, व उरलेले दोन इसम माझ्या घराकडे येणाऱ्या पायऱ्यांकडे वळले.त्यापैकी एकाच्या हातात नायलॉनची मोठी पिशवी होती.
ते दोघे वर जाऊन संजय कुलकर्णी यांच्या घरासमोरील मीटिंग हॉलचे कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला.या आवाजामुळे कुलकर्णी यांच्या घरातील आजारी वृद्ध पालकांनी आरडाओरड केली. त्यांचा नातू चिन्मय धावत हॉलजवळ गेला असता त्याने कुलूप तोडलेले पाहिले.त्याने दरवाजा उघडताच आत लपलेला एक अज्ञात इसम बाहेर येऊन त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने चिन्मय हल्ल्यात बचावला.
दरम्यान, या अज्ञात इसमांपैकी एक इसम माझ्या मी माझ्या परिवारा सह राहत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटकडे आला होता. माझा नातू त्याच वेळी माझ्या समोरील फ्लॅटमध्ये जेवण करत असलेल्या आई व आत्याला पोळी देऊन परत आला. त्याला पाहून तो अज्ञात इसम तात्काळ खाली उत्तरला.
ही संपूर्ण घटना माझ्या सीसीटीव्ही केमेरा मध्ये कैद झाली आहे.
संबंधित फुटेज मी शहर पोलीस स्टेशनमध्ये सादर केले आहे.मी पत्रकार असून मी वारंवार समाजातील भ्रष्टाचार व अवैध धंद्यांबाबत माझ्या माध्यमातून सत्य उघडकीस आणतो. याआधीही या जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती. याबाबत मी दिनांक 29/01/2023 रोजी शहर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दिली होती.त्या मागील कालावधीत माझ्या चार चाकी आरामदायी गाडीला आग लावण्याचा प्रयत्न झाला होता.
crimenews:वरील घटना पाहता, दिनांक 26/05/2025 रोजी आलेल्या या अज्ञात इसमांचा सटे गंभीर व घातपातपूर्ण होता, असा माझा ठाम संशय आहे. त्यामुळे, या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही विनंती. मला व माझ्या परिवारातील सदस्यांच्या जिवीतास धोका असल्याने रक्षण करावे व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना चांगला झोप देऊन भविष्यातील होणारा अनर्थ टाळावा असे निवेदन सादर करण्यात येत आहे.