सुरेश देशमुखचा मारेकरी खालिद शेखला अखेर पोलीस कोठडी / crime news

 

 

श्याम वाळस्कर सह प्रतीक कुरेकर मुर्तीजापुर अकोला

 

मुर्तिजापूर शहरात शुक्रवारी २७ ऑक्टोंबर रोजी भगतसिंग चौकात गुन्हेगार सुरेश देशमुख याची चाकूने भोसकून भीषण हत्या करण्यात आली.या प्रकरणातील आरोपी खालिद शेख याला येथील न्यायाधीशांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

या परिसरात राहणारे सुरेश देशमुख हे तुरुंगवास भोगून घरी परत आले असून त्यांच्यावर ३०२ सहअनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्यांनी भगतसिंग चौक परिसरात मागील अनेक दिवसांपासून अनेक लोकांना चाकू दाखवणे त्यांना शिवीगाळ करणे,मारहाण करणे,काही लोकांना जीवे मारण्याची सुद्धा धमकी देणे असे प्रकार केल्याचे नागरिक सांगत आहेत.

परिसरातील सर्व नागरिक सुरेश देशमुख यांच्या वर्तणुकीमुळे वैतागले होते.शुक्रवारी २७ ऑक्टोंबर रोजी सुरेश देशमुख हा खालिद शेख नामक युवकाच्या मागे चाकू घेऊन लागला होता,तेव्हा खालिद शेख हा पळत असताना त्याला सुरेश देशमुखने चाकू फेकून मारला पण निशाणा चुकला असेही नागरिकांनी सांगितले आहे.

यादरम्यान खालिद शेख याने तो पडलेला चाकू उचलला आणि सुरेश देशमुखच्या पोटात वार केले त्यातच सुरेश देशमुखचा जागीच मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणामध्ये शनिवार २८ ऑक्टोंबर रोजी आरोपी खालिद शेख याला न्यायालयात हजर केले असताना न्यायाधीशांनी ३० ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात एपीआय अनंत वळतकर करीत आहेत. Crime news

 

 

Leave a Comment