जळगाव जा. :- आज दिनांक २९ ऑक्टोबरला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये बैठक आयोजित केली होती.
येत्या १ नोव्हेंबर पासुन बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची सोयाबीन कापसाची दरवाढ,२२ जुलैला झालेली ढगफुटी त्याची न मिळालेली मदत,पिक विमा व इतर काही मागण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एल्गार रथयात्रा काढण्यात येत आहे ती रथयात्रा जळगाव जामोद तालुक्यात येत्या ३ व ४ नोव्हेंबरला येत आहे.
खरंतर या संपूर्ण विदर्भामध्ये सोयाबीन कापसाचा पेरा सर्वाधिक आहे. मात्र सोयाबीन कापसाला भाव नाही २२ जुलैला जळगाव जामोद,संग्रामपूर तालुक्यामध्ये ढगफुटी झाली त्या ढगफुटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले त्याची सुद्धा आजपर्यंत नुकसान भरपाई सरकारकडून भेटलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी पिकाचा पिक विमा काढला त्यांना पिक विमा मिळालेला नाही.
म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं हा मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला जर सरकारला आमचं जगणं मान्य नसेल तर आम्ही काय करायचं त्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी १ नोव्हेंबर पासून एल्गार रथयात्रेच आयोजन केलं.
तरी ही एल्गार रथयात्रा दिनांक ३ नोव्हेंबरला सकाळी खेर्डा बु. ,उटी खु. ,उटी बु. ,वडशींगी, मडाखेड खु. ,चावरा, ईलोरा ,भेंडवळ बु. ,कुरणगाड बु. ,टाकळी पारस्कार,गोळेगाव नवे व संध्याकाळी ८ वाजता सातळी येथे भव्य सभा होणार आहे.
व दुसऱ्या दिवशी ४ नोव्हेंबर ला सकाळी खांडवी, पिंपळगाव काळे, पडशी वैद्य, आडोळ, तिवडी, दादुलगाव, मानेगाव व पुढील दौरा हा नांदुरा तालुक्याच्या दिशेने जाणार आहे.
या रथयात्रेच्या नियोजनासाठी जळगाव जामोद तालुक्यातील भूमिपुत्रांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला तालुक्यातील शेतकरी शेतमजूर उपस्थित होते. Elgarmorcha