dhangar aarakshan/एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाचे लाक्षणिक उपोषण

0
28

 

बातमीदार ऋषिकेश सुरवसे

उमरगा : महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, तसेच मागील दहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले दीपक बोऱ्हाडे यांचे उपोषण सोडवण्यासाठी व धनगर समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावे, अशा मागनीचे निवेदन उमरगा तहसीलदार यांना शुक्रवारी (दि.२६) रोजी देण्यात आले.

उमरगा तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाची अनुसुचित जमातीच्या (एस.टी.) प्रवर्गात व भारतीय घटनेत ३६ क्रमांकावर धनगर ही एकच जमात असून, भारतातील इतर राज्यामध्ये अंमलबजावणी झालेली आहे.

परंतू महाराष्ट्र राज्यामध्ये स्वातंत्र्यापासून आजपर्यंत अनेक सरकारे आले आणि गेले फक्त आश्वासने देवून, जाणिवपूर्वक एस.टी. ची अंमल बजावणी करून .अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र देत नसून, या बाबत महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर समाजावर फार मोठा अन्याय झालेला असून यासाठी मराठवाड्यातील जालन्यामध्ये धनगर समाजाचे दिपक बोऱ्हाडे हे गेल्या १० दिवसापासून आमरण उपोषणाला बसले असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय लाक्षणीक उपोषण करण्यात येत आहे.

तसेच शासनाने तात्काळ निर्णय नाही घेतल्यास विजयादशमी दसऱ्यानंतर महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

dhangar aarakshan/निवेदनावर अखिल भारतीय धनगर समाज संघटनेचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय गाडेकर, वैजीनाथ कागे, संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कलिंदा घोडके, महिला प्रदेशअध्यक्षा शिवाजी गावडे, माजी नगसेवक गोविंद घोडके,जालिंदर सोनटक्के,बालाजी घोडके,अरुण गडदे,उत्तमराव घोडके,राम घोडके,खंडू दुधभाते,अर्जुन दुधभाते,गोपाळ घोडके,लक्ष्मी घोडके,सुवर्ण ब्याळे,कविता घोडके,सविता दुधभाते,शोभा हिंडोळे, कोंडाबाई वाघमोडे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here