बातमीदार ऋषिकेश सुरवसे
उमरगा तालुक्यातील बलसुर येथील श्री. छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवार (ता .९) वादविवाद स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.टी.गायकवाड होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते, साने गुरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बळीराम नांगरे, प्रा. परमेश्वर सूर्यवंशी , प्रा. एन.टी. तेलंग, सतीश कांबळे, के.डी.कांबळे आदींची उपस्थिती होती.
उच्च माध्यमिक विद्यालयाची तालुकास्तरीय स्पर्धा प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरुम येथे संपन्न झाली. प्रगती औसेकर व राणी भालेराव यांनी लोहारा-उमरगा तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावून रोख पाच हजार रुपये बक्षीस मिळवले.
तर उमरगा येथे कै. शरणाप्पा मलंग विद्यालयात शालेय तालुकास्तरीय वाद-विवाद स्पर्धेत माध्यमिक विद्यालयातील श्रावणी वाकडे व संजीवनी सूर्यवंशी उत्तेजनार्थ क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचा संघ व्यवस्थापक एस. टी .गायकवाड, के .डी .कांबळे व मार्गदर्शक शिक्षक प्रा. पी .बी .सूर्यवंशी व सतीश काबळे यांचा सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शक शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार श्री. नांगरे यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी सतीश कांबळे, एस.टी .गायकवाड, बळीराम नांगरे यांची भाषणे झाली.
Dharashivnews/कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. परमेश्वर सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन श्रेया बोंडगे यांनी तर आभार संजीवनी मुगळे यांनी मांडले. यावेळी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.