इस्माईल शेख बुलढाणा जि. प्र.
शेगांव .शहरात मोकाट कुत्र्यांचा हौदोह दिवसेंदिवस वाढत चालला असून अनेक लोकांनवर कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला चढवून जख्मी केले आहे.
तर दि.२८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी कु.रित कन्हैयालाल चौधरी या आठ वर्षीय बालीकेवर चार ते पाच मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून गंभीरपणे जख्मी, केल्याची घटना धानुका कंम्पाऊंड येथे घडली.
सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )
याबाबत प्राप्त माहिती अशी की आठ वर्षीय रित ही आपल्या आजीसोबत घरासमोरील रोड वर फिरत असतांना अचानकपणे चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढविला व तीला १० फुटा पर्यंत फरफरट नेले.
यावेळी कुत्र्यांनी सदर बालीकेच्या डोक्यावरील केस मासासह ओढुन नेले.तेथील लोकांच्या सर्तकतेमुळे मुलीचे प्रणाम वाचले .
बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जख्मी अवस्थेत सदर बालीकेस प्रथम स्थानिक सराफ यांच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बालीका गंभीरपणे जख्मी असल्याने पुढील उपचारार्थ अकोला येथील डॉ. एन.आर.सलामपुरीया यांचे श्रीराम रूग्णालयात संध्याकाळी ७ वा नेण्यात आले असू दि.२९/२/२०२४ रोजी दुपारी २ वाजता बालीकेवर शस्त्रक्रिया करण्याचे कार्य सुरु होते.
या घटने नंतर शहरातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी शेगांव शहर भाजपा चे वतीने मा.मुख्याधिकारी यांना दि.२९/२/२०२४ रोजी निवेदन देण्यात आले.
Dognews:यावेळी भाजपा नेते शरदसेठ अग्रवाल, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे,माजी नगरसेवक संदिप काळे,मंगेश फुसे,शेगाव शहर व्यापारी परिषदचे अध्यक्ष शेखर नागपाल,ललित खंडेलवाल आदीसह पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.