नवनिर्वाचित संचालकांचा आ डॉ संजय कुटे यांचे हस्ते सत्कार.(drsanjaykute)

0
614

 

drsanjaykute:संग्रामपूर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक दिनांक 31 मे रोजी पार पडली त्याचा निकाल काल 1 जुन रोजी घोषित करण्यात आला असुन यामध्ये शेतकरी परिवर्तन पॅनेल चा दणदणीत विजय संपादन केला आणि १५ पैकी या पैनल चे १४ संचालक विजयी झाले.

या सर्व विजयी संचालकांचा आ डॉ संजय कुटे यांच्या हस्ते पुष्पहार घालून व पेढ़ा भरवून त्यांचे निवास स्थानी उत्सहात सत्कार करण्यात आला.

निसर्गासाठी नारी शक्तीचा जागर! विदर्भ वि.प्र. नारी शक्ती सेवाद्वारे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!(MurtijapurNews )

यावेळी शेतकरी परिवर्तन पॅनेल ची विजयी पताका फडकवन्या साठी झटलेले संग्रामपूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आ डॉ कुटे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात ही निवडणूक लढल्या गेली यावेळी सूक्ष्म नियोजन करीत संग्रामपूर तालुका अध्यक्ष तथा कृऊबास सभापती भाऊराव पाटील यांच्या नविनतम कार्यकाळात भाजपा प्रणित पॅनेल ची ही पहिलीच निवडणूक संग्रामपूर तालुक्यात लढली गेली.

यामध्ये विरोधी पॅनेल ला सोसायटी मतदारसंघातून एकच जागा निवडून आणता आली तर इतर सर्व मतदारसंघात शेतकरी पॅनेल चे छत्री या निशाणी वर एकूण 14 संचालक निवडून आले. निकाल जाहीर झाल्या नंतर परिवर्तन पॅनेल चे सर्व विजयी उमेदवार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी फटाके फोडून, पेढे वाटून, ढोलताशे वाजवीत मोठा जल्लोष साजरा केला होता.

यावेळी कार्यकर्त्याच्या जोरावर आपण संग्रामपूर तालुक्यालतील सहकार क्षेत्र पुर्णपणे काबीज केले असुन ते निरंतर टिकवाण्याची जबाबदारी तुमच्यावर आली आहे.

drsanjaykute:तसेच या निवडणुकी मधे शेतकऱ्यांनी पॅनेल वर दाखवलेला विश्वास आणि परिवर्तन पॅनेल मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीच्या जोरावर हा भरघोष विजय संपादन करता आला असुन सर्व विजयी संचालकांनी संग्रामपूर तालुका खरेदी विक्री संस्थेच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने विकासात्मक व शेतकरी हिताची कामे करावी असे प्रतिपादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here