Drsanjaykute/न्यायालयीन इमारतीच्या बांधकामास आमदार डॉ. संजय कुटे यांच्या प्रयत्नामुळे प्रशासनाची मान्यता
जळगांव जामोद : जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व माजी कॅबिनेट मंत्री आ. डॉ. संजय कुटे यांचा जळगांव जामोद बार असोसिएशनच्या वतीने आज शहरात जाहीर सत्कार करण्यात आला. Drsanjaykute
शहरात जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कोर्ट स्थापन करण्याच्या अनुषंगाने शासनाने निर्णय क्र. सीसीबी-1125/प्र.क्र.66/का-13 दि. 9/9/2025 नुसार जळगांव जामोद येथे न्यायालयीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोन कोर्ट हॉल बांधण्यासाठी 1,16,92,443/- रुपये इतक्या अंदाजीत खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली आहे.Drsanjaykute
Drsanjaykute/या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या पाठपुराव्यात डॉ. कुटे यांचा मोलाचा वाटा असून, त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून जळगांव जामोद वकील संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकील संघाचे अध्यक्ष अँड. मोहम्मद इरफान होते, तर कार्याध्यक्ष अँड. डी. जी. खेर्डेकर, सचिव अँड. आनंद जोशी यांसह जेष्ठ वकील आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात अँड. बावने यांनी त्यांच्या समधुर आवाजात “एक उत्कृष्ट नेता, विश्वविजेता आहात आपण… जळगांव जामोद शहराची शान आहात आपण…” अशी कौतुकास्पद कविता सादर केली. कार्यक्रमाची प्रस्तावना अँड. दत्तात्रय गंगाराम खेर्डेकर यांनी केली, सूत्रसंचालन अँड. स्वप्नील राजपूत यांनी तर आभार प्रदर्शन अँड. निशा वानखडे यांनी केले.
Drsanjaykute/डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वामुळे जळगाव जामोद शहरात न्यायालयीन सुविधांचा विकास होण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले असून, यामुळे स्थानिक नागरिक व वकिलांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.








