दिनांक 4 ऑक्टोंबर रोजी ग्रामपंचायत पळशी झाशी मार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व सेवा पंधरवडा अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महिला बचत गट गटांमार्फत वस्तू विक्री प्रदर्शनी तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला होता, त्यामध्ये सर्वप्रथम श्री गणेशजी महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे पूजन करून गावातून टाळ मृदंगाच्या गजरात भव्य अशी स्वच्छता रॅली काढण्यात आली.
पंचायत समिती संग्रामपूर येथे कार्यरत प्रवीण जी गोंड साहेब यांचा मुलगा वंश या चिमुकल्याच्या वृक्ष प्रेमामुळे माननीय आमदार साहेब यांच्या हस्ते, सर्व रोजगार सेवकांचे उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
त्यानंतर श्री शंकर जी महाराज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमांमध्ये विविध स्टॉल लावण्यात आले होते, त्या सर्वांची पाहणी माननीय आमदार साहेब, टाले साहेब, व उपस्थित मान्यवरांनी केली, व सर्व गोष्टीचे कौतुक केले, तसेच उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले,
ग्रामपंचायत पळशी झाशी नेहमीच आपल्या विविध उपक्रमातुन वेगवेगळे कार्यक्रम घेत असते यामध्येच हा भव्य दिव्य असा कार्यक्रम पार पडला,
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शासनामार्फत आयोजित सेवा पंधरवडा कार्यक्रमांमध्ये तसेच ग्रामपंचायतला सहकार्य करणारे भजन मंडळ श्री शंकर जी महाराज महिला भजन मंडळ, पार्वता माता महिला भजन मंडळ, श्री स्वामी समर्थ महिला भजन मंडळ, यांचे सत्कार करण्यात आले, तसेच कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या श्री शंकरगिरी महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांचा तसेच जिल्हा परिषद शाळेमधील विविध स्पर्धेत सहभाग घेऊन, भक्ती भटकर वेदिका गिरी गुंजन चव्हाण श्रावणी मारोडे दीपिका बांगर रुद्र दाभाडे पायल डांबरे आरती मारोडे गुंजन चव्हाण आरती मारोडे, या विद्यार्थ्यांनी नंबर मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच दैनिक साक्षीदार चे संपादक श्री प्रल्हाद दातार यांचे स्वागत करण्यात आले,
तसेच आयोजित कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये उत्कृष्ट व्यवसाय प्रदर्शनीत, राधास्वामी स्वयंसहायता समूह(मीनाताई रहाटे), जय दुर्गा स्वयंसहायता समूह, फुले शाहू आंबेडकर स्वयंसहायता समूह यांनी अनुक्रमे एक दोन तीन नंबर पटकावला,
डिश डेकोरेशन स्पर्धेमध्ये उन्नती स्वयंसहायता समूह,(योगिता शिरसोले), तारूमाता स्वयं सहायता, रमाई महिला स्वयंसहायता समूह यांनी अनुक्रमे एक दोन तीन नंबर पटकावले
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या स्पर्धेमध्ये आदर्श स्वयंसहायता समूह (पूजा अनंत मारोडे), पूजा संगम वाघ, पुनम राहुल गिरी, यांनी नंबर मिळवले, तर संगीत खुर्ची स्पर्धेत कल्पना चितोडे, सुनिता ताई संजय मारोडे, मनीषाताई निलेश मारोडे, यांनी अनुक्रमे नंबर मिळवले,
तर रांगोळी स्पर्धेमध्ये, निकिता मारोडे सानिका दाने, योगिता मारोडे, वैष्णवी दिलीप मारोडे, यांनी एक दोन तीन क्रमांक मिळाले,
उखाणे स्पर्धेमध्ये मीनाताई राहटे, भारती अमोल दामले, हर्षाताई विठ्ठल यादगिरे व मंगलाताई करांगळे यांनी अनुक्रमे एक दोन तीन नंबर मिळवले, सदर कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गावातील बचत गटांनी सहभाग घेतला होता,
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ माधुरीताई कैलास मारोडे, प्रमुख मार्गदर्शक माननीय आमदार संजू भाऊ कुटे, प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस निरीक्षक माननीय श्री पंडितराव सोनवणे साहेब, बोपटे साहेब, रामकिसनजी माळी साहेब पंचायत समिती संग्रामपूर मार्फत माननीय श्री टाले साहेब, प्रवीणजी गोंडे साहेब, सरपंच सौ प्रियांका राहुल मेटांगे, उपसरपंच पंचफुलाबाई पवार, माननीय श्री गुलाबराव जी मारोडे,पोलीस पाटील संतोष भाऊ निकाळजे, ,सौ ललिता ताई आखरे,सरस्वती ताई संजय बापट, रेखाताई तांगडे, गुणवंत मारोडे, विनायकराव रहाटे, दत्तात्रय भाऊ पाचपोर, ग्रामपंचायत सदस्य सौ संगीता ताई ची तोडे,उमेश भाऊ कोठे, सुरेश भाऊ हेलगे, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल मेटांगे, सूत्रसंचालन गावचे तलाठी श्री रंगदळ साहेब, तर आभार प्रदर्शन सचिव हेमंत बापू देशमुख यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी सविताताई चितोडे, गोकुळा ताई ठाकरे, वैशाली मारोडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली
( गावामध्ये एकी असल्यास गावाचा विकास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, पळशी झाशी गाव सर्व एकत्रित राहून गावाचा विकास करत आहे ही आनंदाची बाब आहे.
Drsanjaykute/आमदार संजू भाऊ कुटे,)
( माननीय आमदार साहेबांनी गावात वेळोवेळी निधी टाकून गावाच्या विकासात मोठा हातभार लावलेला आहे, तसेच गावातील सर्वच उपक्रमांमध्ये गावकरी मोठ्या संख्येने सहभाग घेत आहेत, त्याबद्दल माननीय आमदार साहेब व गावकरी यांचे मनःपूर्वक आभार . तसेच या सर्व उपक्रमांमध्ये नेहमी आमच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी देणारे पत्रकार बांधव यांचे सुद्धा खूप मोठे योगदान आहे,
सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे)