Drsanjaykute /“सकारात्मक ध्येय आणि विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर मत मागा” – आ. डॉ. संजय कुटे

0
88

 

Nagarparishadnews /जळगाव जामोद नगर सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज जळगाव जामोद येथील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली.

या बैठकीत पक्ष कार्यकर्त्यांना जनसंपर्क मोहिमेचे मार्गदर्शन करताना विकासमुखी भूमिका मांडण्याचे आवाहन केले.

मागील काळात झालेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत पुढील नगरपरिषदेच्या निवडणुकीत सकारात्मक ध्येय, पारदर्शकता, आणि सर्वसमावेशक विकास या मुद्द्यांवर जनतेचे आशीर्वाद मिळवण्याचे आवाहन केले.

पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांची निष्ठा व जनतेचा विश्वास या जोरावर आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष निश्चितच विजय मिळवेल असा विश्वास आहे.
#drsanjaykute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here