Farmernews/ मनसेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन  शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी

0
103

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा (दि. २२ सप्टेंबर) :वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.Farmernews

शंकर पोटफोडे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धा) यांच्या मार्गदर्शनाखाली व जयंत कातरकर (जिल्हाध्यक्ष, शेतकरी सेना), नितीन अमृतकर (जिल्हा उपाध्यक्ष, मनसे) यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले.rajthacry

गेल्या काही दिवसांतील अवकाळी पाऊस, हवामानातील अस्थिरता आणि कीडरोगामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी खत, बियाणे, औषधे, मजुरी यावर मोठा खर्च केला; मात्र आज पिकं उभ्या अवस्थेत नासाडीला गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
प्रमुख मागण्या :

1. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.

2. विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

3. पंचनामे लांबवण्याऐवजी तत्काळ पूर्ण करून मदत वितरित करावी.

4. शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी कर्जमाफी व अन्य सवलती द्याव्यात.

Farmernews /या वेळी प्रमुख उपस्थित होते :राजू बोंबले (जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी सेना), धर्मदीप हीवरकर (वर्धा तालुका अध्यक्ष), नितीन परतेकी (तालुका संघटक), पवन तडस (हिंगणघाट तालुका अध्यक्ष), ओम क्षीरसागर (शहर अध्यक्ष), किशोर भुरे, दिवाकर मून, राजू पोकळे, रोहित कल्याणी, मेहेर अळसपुरे, चंद्रशेखर राऊत, राहुल नागोसे, प्रेम नागेश्वर, शंकर वासनिक तसेच मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here