नुकताच जिल्हा केंद्रीय सहकारी बँक बुलढाणाच्या संचालक मंडळ निवड़णुकीला सुरुवात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव जामोद तालुक्यातील सहकार क्षेत्राच राजकारण तापल आहे. 24 जुलै 2026 या अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसा पर्यंत जळगाव जामोद तालुका सोसायटी मतदारसंघातुन एकूण 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.bjpnews
त्यामधे सहाकार नेते राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटिल, भाजपाचे परीक्षित ठाकरे आणि कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटिल, ज्योतीताई ढोकणे, जुबेर पटेल या तिघानी अर्ज दाखल केले. कॉंग्रेस पक्षाचे 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटिल व ज्योतीताई ढोकणे यांच्या अर्जावर भाजपा कार्यकर्ते असलेल्या बँक प्रतिनिधीच्या अनुमोदक म्हणून सह्या असल्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात तो चर्चेचा विषय ठरत आहे.

यापूर्वी सुद्धा जळगाव जामोद कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकी मध्ये कॉंग्रेस पक्षाने प्रसेनजीत पाटिल यांच्या विरोधात भाजपाला साथ देत निवडणुक लढ़विली तेव्हा सर्वसामान्य कॉंग्रेसी विचारधारेच्या जनतेचा मोठा रोष पक्षावर आल्याचे दिसून आले होते.
कॉंग्रेस, भाजपा कट्टर वैचारिक वाद असलेले पक्षातील नेते स्थानिक पातळीवर असे जुळवुन घेत असतील तर त्यावर राज्य पातळीवरील नेत्याची भूमिका काय असा प्रश्न जनतेला पडलेला आहे.harshvardhansapkal
Prakashpatil/कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष भाजपाच्या मदतीने निवडणुक रिंगनात उतरण्याच्या चर्चा राजकीय क्षेत्रासह सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा रंगू लागल्याने त्यावर जिल्हातीलच असलेले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तथा कॉंग्रेस पक्षाचे अन्य नेते काय भूमिका घेतात याकड़े सर्वाचे लक्ष लागलेले आहे.



