माॅयल लिमिटेड मुंबईच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत दिव्यांगांसाठी सहाय्यक उपकरणे व मोफत वाटपासाठी पंचायत समिती चामोर्शी येथे शिबिर संपन्न.(Gadchirolinews)

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी: पंचायत समितीचा चामोर्शीच्या पटांगणात मायल लिमिटेड मुंबई च्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत दिव्यांगासाठी सहाय्यक उपकरणे मोफत वाटपासाठी शिबिर आज दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आला.

प्रसंगी शिबिराचे अध्यक्ष संवर्ग विकास अधिकारी सागर पाटील हे होते तर विशेष अतिथी म्हणून विनयकुमार व्यवस्थापक माॅयल लिमिटेड कंपनी मुंबई, प्रशांत खुरसुंगे संचालक माॅयल लिमिटेड कंपनी मुंबई,कमलेश यादव कार्यक्रम अधिकारी हे होते.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

दिव्यांगासाठी आयोजित अस्थिव्यंग,दृष्टीदोष,कर्णदोष या प्रवर्गातील वयोगट तीन ते जवळपास 75 वर्षातील चामोर्शी तालुक्यातील 240 लाभार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले.

तसेच दृष्टीदोष,कर्णदोष यांची मोफ तपासणी करण्यात आली.कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भारतीय कृत्रिम अपंग निर्माण मुंबई,तर सहकार्यासाठी जिल्हा प्रशासन,जिल्हा समाज कल्याण विभाग गडचिरोली व पंचायत समितीचा चामोर्शी यांनी यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विनीत पेंदोर,गोपीनाथ बोरकुटे,गट साधन केंद्राचे विशेषतज्ञ सुशील गजघाटे,विशेष शिक्षक रवी खेवले,जीवन शेट्टे,हिमदेव पिपरे,कु मेघा कोहपरे,कु रिता चव्हाण व उमेश पोहाणे यांनी सहकार्य केले.

Gadchirolinews:कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांगदेव सोरते यांनी केले. दिव्यांग लाभार्थ्यांना नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

Leave a Comment